Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी : भारतीय सैन्यातील अधिकारी बनून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एकास अटक, 18 लाखाचा मुद्देमाल जप्त

team by team
April 23, 2024
in क्राईम
0
मोठ्ठी बातमी : भारतीय सैन्यातील अधिकारी बनून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एकास अटक, 18 लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय सैन्यातील अधिकारी आहे असे सांगून अवैध दारूची वाहतूक करणारा तोतया पोलीसांनी वाहनासह एकूण 17 लाख 88 हजार 685 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत जप्त केला आहे.

 

 

 

अधिक माहिती अशी की, 21 एप्रिल रोजी 2024 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील जगतापवाडी जवळील उड्डाणपुलाकडून करण चौफुलीकडे एक ग्रे रंगाच्या इनोव्हा कारमधून अवैध दारुची चोरटी वाहतूक करणार असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी सदर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना देवून कारवाई करण्यातबाबत आदेशीत केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी तात्काळ रवाना केले.

 

 

 

 

मिळालेल्या बातमीच्या आधारे पथकाने नंदुरबार शहरातील करण चौफुली येथे सापळा रचला.

 

 

 

 

त्याच दरम्यान दुपारी 2 वा. सुमारास जगतापवाडीकडून करण चौफुलीकडे एक ग्रे रंगाची इनोव्हा कार येतांना दिसली, म्हणून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वाहनास हाताचा इशारा देवून थांबविले. वाहन चालकास खाली उतरविले असता त्यामध्ये भारतीय सैन्याचा गणवेश व खांदयावर राजमुद्रा असा ड्रेस परीधान केलेला अधिकारी खाली उतरला. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मेजर राहिल शेख, ई एम.ई. युनिट स्टेशन वर्कशॉप, बैंगलोर येथे नेमणुकीस आहे असे सांगितले. तसेच त्यास वाहनात काय आहे? याबाबत विचारले असता वाहनात दारु व बियरचे टीन असून ते त्यांच्या सोबतचे अधिकारी व कर्मचारी राहत असलेल्या राजस्थान येथे घेवून जात असल्याबाबत सांगितले. व अधिक विचारता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, म्हणून पथकातील अधिकारी व अंमलदार यांना संशय आल्याने त्यास अधिकची सखोल विचारपुस केली असता सदर व्यक्ती याने तो भारतीय सैन्याचा अधिकारी नसुन दारु वाहतुक सुरळीत करण्यासाठी त्याने बनावट ओळखपत्र, वाहतुकीसाठी बनावट कागदपत्रे, वाहनाचा बनावट क्रमांक तयार करुन घेतला असल्याबाबत सांगितले.

 

 

 

 

ताब्यात घेण्यात आलेला तोतया अधिकारी मोहम्मद फारुक शेख शफी, रा. प्लॉट नंबर-04, गणेशपुरी, मेहरुण, ममता हॉस्पीटलच्या मागे, जळगांव ह.मु. 32 नुर बंगलो, मधु नगर जवळ, वडोदरा गुजरात याच्या ताब्यातून विदेशी दारु, अवैध वाहतूकीसाठी वापरण्यात आलेले वाहन, मोबाईल असा एकुण 14 लाख 20 हजार 240 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

 

 

 

सदर तोतया अधिकारी मोहम्मद फारुक शेख शफी हा महाराष्ट्र राज्यातुन गुजरात राज्यात अवैध दारुची वाहतुक करण्या कामी खांद्यावर राजमुद्रा असलेला भारतीय सैन्याचा गणवेश परीधान करुन भारतीय सैन्याची बनावट वाहन नंबर प्लेट त्याचा वाहनास लावून दारु वाहतुक करतांना मिळून आल्याने त्याच्याविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 420, 464, 465, 468, 471, 140, 170, 171 सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 तसेच मोटार वाहन कायदा कलम 192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

तसेच गुन्ह्याच्या पुढील तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मोहम्मद फारुक शेख शफी याच्या गुजरात राज्यातील वडोदरा येथील घराची झडती घेतली असता तेथे देखील 3 लाख 68 हजार 445 रुपये किमतीचा दारुचा साठा मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयात एकुण 17 लाख 88 हजार 685 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

 

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, राकेश वसावे, पोलीस नाईक विशाल नागरे, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार आनंदा मराठे, शोएब शेख, यशोदिप ओगले तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस अंमलदार अनिल बडे, युवराज राठोड, प्रविण वसावे, राहुल पांढारकर यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भारत आदिवासी पार्टीचे उमेदवारला विविध संघटनांचा वाढता पाठिंबा, एमआयएम लवकरच पाठिंबा जाहीर करणार : रविंद्र वळवी

Next Post

दोन दुचाकीच्या भीषण अपघात, उपसरपंचासह चौघांचा मृत्यू

Next Post
दोन दुचाकीच्या भीषण अपघात, उपसरपंचासह चौघांचा मृत्यू

दोन दुचाकीच्या भीषण अपघात, उपसरपंचासह चौघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add