Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारत आदिवासी पार्टीचे उमेदवारला विविध संघटनांचा वाढता पाठिंबा, एमआयएम लवकरच पाठिंबा जाहीर करणार : रविंद्र वळवी

team by team
April 23, 2024
in राजकीय
0
भारत आदिवासी पार्टीचे उमेदवारला विविध संघटनांचा वाढता पाठिंबा, एमआयएम लवकरच पाठिंबा जाहीर करणार : रविंद्र वळवी

नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीकडून मला निवडणूक लढण्याची संधी दिली असून ओबीसी राजकीय आघाडीने पाठिंबा दिला असून एमआयएम पक्षाशी चर्चा झाली असून लवकरच तेही पाठिंबा देणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांच्या विरुद्ध व गरिबांच्या हक्कासाठी मी उमेदवारी करत असल्याचे भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार रविंद्र रणजित वळवी यांनी सांगितले.

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/04/video_20240422_175907.mp4

नंदुरबार येथे लोकसभेसाठी भारत आदिवासी पार्टी व ओबीसी राजकीय आघाडीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीतील भारत आदिवासी पार्टीतर्फे असलेले उमेदवार रविंद्र रणजित वळवी बोलत होते.यावेळी पुढे बोलताना रविंद्र वळवी पुढे म्हणाले की, नंदूरबार लोकसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीकडून मला निवडणूक लढण्याची संधी दिली असून ओबीसी राजकीय आघाडीनेही पाठिंबा दिला असून एमआयएम पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

लवकरच तेही पाठिंबा देणार असल्याचे सांगत संविधान वाचविण्यासाठी व सर्वधर्मसमभाव तसेच प्रकृती वाचावी यासाठी मी भारत आदिवासी पार्टी तर्फे उमेदवारी करीत आहे.वंचित लोकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात उमेदवारी मिळालेल्या दोन्ही मातब्बर कुटुंबाविरुद्ध मी उमेदवारी करीत आहे स्वातंत्र्यानंतर ही जिल्ह्यात विकास झाला नसून जिल्ह्याचा विकासासाठी माझी ही उमेदवारी आहे.

तसेच खोटे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासींचे जल, जंगल आणि जमीनचे अधिकार मजबूत करण्यासाठी आणि इतर आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी भारत आदिवासी पार्टी ही लोकसभा निवडणूक लढणार असल्याची सांगत रविंद्र वळवी पुढे म्हणाले की, मला प्रशासकीय अनुभव असल्याने याचा फायदा नक्कीच होणार आहे 24 एप्रिल रोजी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगत श्री वळवी यांनी भाजपा व काँग्रेसवर टीका केली.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत जिल्ह्यातील विविध संघटना व युवकांनी स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उमेदवार जाहीर करण्यात आला असून प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असलेले रविंद्र वळवी हे भारत आदिवासी पार्टीकडून निवडणूक लढविणार आहे.त्यातच त्यांचे जिल्हाभर संपर्क आहे.यावेळी पत्रकार परिषदेला ओबीसी राजकीय आघाडीचे अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे व भारत आदिवासी पार्टीचे अध्यक्ष ॲड.रूपसिंग वसावे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करा
Previous Post

प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत सामान्य कुटुंबाचा मुलगा बनला न्यायाधीश

Next Post

मोठ्ठी बातमी : भारतीय सैन्यातील अधिकारी बनून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एकास अटक, 18 लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add