म्हसावद । प्रतिनिधी
जिल्हा परिषद कन्या शाळा म्हसावद, केंद्रशाळा म्हसावद मुले, जि. प. शाळा अनकवाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कन्या शाळा म्हसावद येथे भावविभोर निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक पोलीस निरीक्षक राजन मोरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून म्हसावद केंद्राचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल तावडे, केंद्रप्रमुख पराग चव्हाण, ग्राम विकास अधिकारी बी. पी. गिरासे, पर्यवेक्षिका संगिता जयस्वाल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ईश्वर शिरसाठ, बापू पवार, क्रीडा शिक्षक नितीन महिंद्रे, प्राध्यापक प्रकाश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तावडे, केंद्र मुख्याध्यापक पंडीत रावताळे, रविद्र बैसाणे, इरेशा आजुरे, चेतना राठोड, गौतम आगळे, सुनिता सोनार व पालक इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन मुख्याध्यापक रविंद्र बैसाणे यांनी केले.सर्वप्रथम काही विद्यार्थिनींनी सुंदर गाणे गायली. नंतर काही विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य केले. आम्ही त्या कार्यक्रमांमध्ये पूर्ण मग्न झालो. नंतर अनकवाडे या शाळेतील बाल चिमुकल्या कलाकारांनी मतदान जनजागृतीपर अमूल्य मत देण्याचे आवाहन संदेश देणारे एक अप्रतिम सुंदर असे नाटक सादर केले. अध्यक्षीय भाषणात पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सांगितले की, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त, कष्ट व वेळेचे नियोजन गरजेचे असते.
म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत असतात. त्यांचा सर्वांना आयुष्यात खूप उपयोग होतो. आपण सुशिक्षित होत असताना सुसंस्कारित होणे ही महत्त्वाचे असते.त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल तावडे तसेच केंद्रप्रमुख पराग चव्हाण यांनी सुद्धा आपल्या भाषणातून अनमोल असे मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी व सर्वांसाठी उत्कृष्ट सुरुची भोजन तयार करण्यासाठी स्वयंपाकी व मदतनीस लक्ष्मीबाई माळी, मायाबाई शिरसाठ, नीताबेन पाटील, उषाबेन पाटील, मंजुळाताई कुंभार, सतीबाई पाडवी यांनी परिश्रम घेतले.
शेवटी सर्वांचे आभार मुख्याध्यापक रविंद्र बैसाणे यांनी मानत सांगितले की.अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवून जाती दोन दिसांची रंगतसंगत ,दोन दिसांची नाती..!! बघता बघता चार वर्षे कशी निघून गेली आणि ही पाखरे कशी मोठी झाली ते कळलं सुद्धा नाही. आज निरोपाचा क्षण घेताना मनात काहूर दाटला..!!