म्हसावद । प्रतिनिधी:
आगामी काळात लोकसभा निवडणूक व येणारे धार्मिक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर म्हसावद येथे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच समाजकंटक व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यावर वचक ठेवण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद येथे रूट मार्च काढण्यात आला.
लोकसभेची आचारसंहिता लागू असून लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या भेटीघाटी सुरू झाल्या असून राजकीय वारे वाहू लागले आहेत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी तसेच मुस्लिम समुदयाचा पवित्र रमजान हिंदु नववर्ष प्रारंभ म्हणजेच गुडीपाडवा,महामानव डॉ.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,श्रीराम नवमी या एप्रिल महिन्यात आहेत.जातीय सलोखा सोबतच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समाजकंटक गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी म्हसावद येथे रूट मार्च काढण्यात आला.
म्हसावद गावात पोलीस स्टेशन येथुन मच्छी बाजार, बाजार चौक, बहिरोम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साई बाबा मंदिर, सरदार पटेल चौक, धनगर गल्ली, अहिल्याबाई पुतळा, ग्रामीण रुग्णालय म्हसावद, आंबाजी माता मंदिर व पोलीस ठाणे येथे समाप्त झाले. सदर रुटमार्च कामी शहादा पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार,सपोनि राजन मोरे, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, १९ पोलीस अंमलदार, १३ होमगार्ड व सीमा सुरक्षा दल प्लॉटुन यांच्या उपस्थितीत सदरचा रुट मार्च काढण्यात आला.