धुळे l प्रतिनिधी
साक्री तालुका शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना संपर्कप्रमुख व माजी आमदार अशोक धात्रक यांच्याहस्ते शनिवारी दुपारी करण्यात आले.
यावेळी माजी खासदार बापू चौरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख हिंमत साबळे, मा.विरोधी पक्ष नेते नरेंद्र परदेशी, जिल्हा समन्वयक किशोर वाघ, युवासेना विस्तारक कु.प्रियंका जोशी, कामिनी सोनवणे, माजी उपजिल्हाप्रमुख जयप्रकाश भामरे, भुपेश शहा, युवा सेनेचे नितीन गायकवाड, रमेश शिंदे, पंचायत समिती उपसभापती माधुरी देसले आदी उपस्थित होते.
शिवसेना कार्यालय उद्घाटनप्रसंगी साक्री तालुक्यात अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर आ. धात्रक यांनी सांगितले, साक्री तालुक्यात शिवसेनेचे गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी तालुक्यातील सामान्य शिवसैनिक कटीबध्द असून त्यामुळे आज मोठ्या संघटनेचे युवक वर्ग हा शिवसेनेत प्रवेश करीत आहे. नंदुरबार लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड.गोवाल पाडवी यांना साक्री तालुक्यातुन प्रचंड मताधिक्य मिळवून द्यायचे.
त्यासाठी साक्री तालुक्यात गटविकास आघाडीतील पदाधिकार्यांशी चांगला समन्वय ठेवायचाय. शिवसेना हे न संपणारे वादळ आहे. आता साक्री तालुक्यात शिवसेनेचा झंझावात सुरु झालाय. कामच तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी झाली. आज भाजपाच्या संतांनी मोदींना शिवाजी राजे श्रीमान योगी करुन टाकले आहे. शिवाजी राजांशी तुलना करावी असे कुठले काम मांदींनी केले? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडलाय. मणीपूर सारखे छोटेसे राज्य आगीत होरपळत असतांना मणीपूर मध्ये जाऊन शांतता प्रस्थापित करण्याचे धाडस पंतप्रधानांनी दाखविले.
पक्ष फोडणे, सत्तांतर धडवणे, गैर भाजप शासीत राज्यांना त्रास देणे, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणे, गुन्हेगारांना भाजपात प्रवेश देवून मंत्रीपद देणे, शेती मालाला भाव न देता शेतकरी आंदोलन चिरडणे, आज यांच्याकडे पक्ष फोडायला पैसे आहेत. पण शेतकर्यांना द्यायला पैसे नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत की, देशात लोकशाही संपवून हुकुमशाहीकडे वाटचाल मोदींनी सुरु केलीय.
आज लोकसभा निवडणूका लागलीय. या हुकूमशाही वृत्तीला जागेवर जाणण्याकरीता शिवसैनिकांनी जागे राहुन साक्री तालुक्यातून अॅड.गोवाल पाडवी यांना जास्त मताधिक्य मिळवून द्या, असे आवाहन अशोक धात्रक यांनी केले.