Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चांगलं आयुष्य जगण्याचं गुपित म्हणजे ‘सुखी जीवनाची गुरुकिल्ली’ : डॉ.के.बी.पाटील

team by team
March 29, 2024
in सामाजिक
0
चांगलं आयुष्य जगण्याचं गुपित म्हणजे  ‘सुखी जीवनाची गुरुकिल्ली’ : डॉ.के.बी.पाटील

नंदुरबार l प्रतिनिधी
एका लहानशा खेड्यात सधन शेतकरी कुटूंबात जन्मलेली व्यक्ती नंदुरबार मधील एका मोठ्या महाविद्यालयात प्राध्यापक होते, ही गोष्ट आज विशेष वाटणार नाही. परंतू ज्या काळात बहुजन समाजातील पहिलीच पिढी उच्च शिक्षणात आली, त्यावेळेस त्यांच्यासमोर अनंत अडचणी होत्या. विशेषतः योग्य मार्गदर्शनाचा अभाव. तरीही माजी प्राचार्य सखाराम गोविंद पाटील यांनी सर्व अडचणीतून मार्ग काढला. प्रत्येक व्यक्तीसाठी मोठं समाधान देणारी गोष्ट म्हणजे आपल्या वाट्याला आलेल्या आयुष्यापेक्षा आपल्या मुला, बाळांना अधिक चांगलं आयुष्य मिळावं हे असते. आणि हेच गुपित ‘सुखी जीवनाची गुरुकिल्ली’ या पुस्तकात दडलंय, असे प्रतिपादन माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी केले. ते येथील इंदिरा गांधी मंगल कार्यालयात पुस्तक प्रकाशन प्रसंगी बोलत होते.

 

 

येथील निवृत्त प्राचार्य सखाराम गोविंद पाटील यांचे लिखित सुखी जीवनाची गुरुकिल्ली या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राचार्य पी.एन.देशपांडे, ज्येष्ठ साहित्यीक डॉ.पितांबर सरोदे, पोलीस उपअधिक्षक संजय महाजन, पत्रकार रमाकांत पाटील, ऋद्र क्रिएशनचे संचालक योगेश्‍वर जळगांवकर उपस्थित होते.

 

सुखी जीवनाची गुरुकिल्ली या पुस्तकामध्ये गुर्जर समाजाची उत्पत्ती, राहणीमान व वास्तव्य याविषयी सखोल माहिती लिहिण्यात आली आहे. यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी माजी प्राचार्य पी.एन.देशपांडे, ज्येष्ठ साहित्यीक डॉ.पितांबर सरोदे, प्रा.ए.डी.बांदल (हैद्राबाद), पत्रकार रमाकांत पाटील, पोलीस उपअधिक्षक संजय महाजन, पत्रकार प्रेमचंद राजपूत यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

कार्यक्रमास प्रा.गुलजारसिंग राजपूत, प्राचार्य बी.एस.पाटील, शेतकी संघाचे चेअरमन बी.के.पाटील, प्राचार्य एस.एन.खैरनार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.सविता पटेल यांनी केले. तर आभार स.गो.पाटील यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजि.प्रशांत पाटील, डॉ.रविंद्र पाटील, प्राचार्य एस.एन.खैरनार, योगेश पटेल, रवींद्र पवार, भिका सोलंकी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

जागतिक रंगभूमी दिनी ‘नंद कवी रंग’ कार्यक्रम, खुल्या रंगमंचावर अनोखा प्रयोग

Next Post

शहादा महाविद्यालयात संशोधन पद्धतीवर सेमिनार उत्साहात

Next Post
शहादा महाविद्यालयात संशोधन पद्धतीवर सेमिनार  उत्साहात

शहादा महाविद्यालयात संशोधन पद्धतीवर सेमिनार उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add