नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील विविध विकास कामाचे शिवसेनेचे तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.
नंदुरबार शहरातील बापू नगर, वेडू गोविंद नगर, सरस्वती कॉलनीमध्ये शुक्रवार (दि.१४) रोजी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तर त्याचप्रमाणे माँ नर्मदा नगर, माँ शारदादेवी नगर, काकासाहेब नगर,सुवर्ण पार्कमध्ये रस्त्याचे भूमिपूजन, घरकुल परिसरात जल कुंभाचे उदघाटन,पातळगंगा परिसरात व्यायामशाळेचे भूमिपूजन देखील करण्यात आले.
यावेळी रघुवंशी यांनी नागरिकांची भेट त्यांच्याशी संवाद साधला. प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,नगरसेवक किरण रघुवंशी,माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक रवींद्र पवार,अशोक राजपूत,जगन्नाथ माळी,अतुल पाटील,चेतन वळवी,मोहितसिंग राजपूत यांच्यासह कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिकेकडून झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.








