नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभेसाठी भाजपातर्फे तिसऱ्यांदा स संसद रत्न खासदार डॉ.हिना गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
आगामी लोकसभेसाठी (Loksabha Election) भाजपने (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात महाराष्ट्रातील २० जणांच्या नावाचा समावेश आहे. यादीत पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे,खा. हिना गावित, पियुष गोयल,मुरलीधर मोहोळ या नेत्यांचा समावेश आहे..
यामध्ये पंकजा मुंडे (बीड) नितीन गडकरी (नागपूर) मुरलीधर मोहोळ (पुणे) हिना गावित (नंदुरबार) सुजय विखे (नगर) सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर) संजय काका पाटील (सांगली) रणजित सिंह नाईक निंबाळकर (माढा) सुभाष भामरे (धुळे) सुधाकर शृंगारे (लातूर) यांना उमेदवारी मिळाली आहे.तर मिहीर कोटेचा (मुंबई उत्तर पूर्व) पियुष गोयल (मुंबई उत्तर) भारती पवार (दिंडोरी) रावसाहेब दानवे (जालना) प्रताप पाटील चिखलीकर (नांदेड) कपिल पाटील (भिवंडी) रामदास तडस (वर्धा) अनुप धोत्रे (अकोला) स्मिता वाघ (जळगाव) रक्षा खडसे (रावेर) यांना संधी देण्यात आली आहे.