नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील नवनाथ नगरमध्ये महिलांच्या लोकवर्गणीतून साकार होणाऱ्या शिव मंदिराचे भूमिपूजन शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
महाशिवरात्री निमित्त नंदुरबार शहरातील विविध भागात शिव मंदिरांमध्ये माजी चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्न रघुवंशी यांच्या हस्ते पूजाअर्चा करण्यात आली.नवनाथ नगरमध्ये आयोजित कार्यक्रमात माजी आ.रघुवंशी म्हणाले, शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला शिव उद्यान धामसाठी 21 फुटांची महादेवांची मूर्ती जयपूर येथून मागविण्यात येत आहे. धाम मध्ये बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती साकारण्यात येईल.
यावेळी महिला भाविकांनी पं.प्रदीप मिश्रा यांची ५ किंवा ७ दिवसीय शिव महापुराण कथा आयोजित करण्याची मागणी शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी होत्या.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेविका भारती राजपूत, माजी नगरसेवक रवींद्र पवार, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी, मोहितसिंग राजपूत आदी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.