नंदुरबार l प्रतिनिधी
का. वि. प्र. संस्था भालेर संचलित. श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे मराठी राजभाषा दिवस व वि.वा.शिरवाडकर यांच्या जन्म दिवस साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दैनिक सकाळचे बातमीदार शांताराम पाटील होते. त्यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुणे प्राचार्या सौ.विद्या चव्हाण , पर्यवेक्षक अनिल कुवर, प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयसिंह ईशी यांनी केले.
विद्यार्थिनींनी मराठी भाषेच्या कविता मराठी ओव्या गायन केले इतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमात विद्यार्थीनींनी मराठी भाषेविषयी गीते सादर केली. आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. आभार प्रदर्शन श्री.कुवर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.