नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर केंद्राची शिक्षण परिषद, जि.प.ठाणेविहीर जि.प. विरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झाली.
अक्कलकुव्याचे शिक्षणाधिकारी मंगेश निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख मोहन बिसनारिया उपस्थित होते, ठाणाविहीरचे सरपंच मानसिंग वळवी, विरपूरचे सरपंच अजित तडवी, सुभाष तडवी, शाळा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, गावातील पदाधिकारी व प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित शिक्षण परिषदेत तुषार पाटील ,जावेद शेख, गणेश लवांडे फारुख बागवान ,बालाजी गुरुनाळे यांनी सविस्तर विवेचन केले. प्रास्तविक ललिता पाटील, सूत्रसंचलन जगदीश धसे व उपस्थितचे आभार प्रदर्शन मेघा कांबळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ठाणेविहीरच्या मुख्याध्यापिका मेघा कांबळे, सहशिक्षक अंजना कलाल ,अमरसिंग वळवी, विरपूरच्या मुख्याध्यापिका ललिता पाटील, सहशिक्षक दिलवरसिंग पाडवी, जगदीश धसे यांनी प्रयत्न केले.
या शिक्षण परिषदेत २०२४ परिषदेचा आढावा, निपुणोत्सव, अंतर्गत निपुण भाषा शैक्षणिक स्वास्थ यात मूलनिहाय नियोजन व विद्यार्थी पोर्टल पोलिओ, व्यवस्थापन समितीचे कार्य व महत्त्व, प्रशासकीय सूचना यावर शिक्षण परिषदेत वरील विषयावर सविस्तर विवेचन करण्यात आले.