नंदुरबार l प्रतिनिधी
महासंसदरत्न खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नंदुरबार लोकसभा मतदार संघातील शिरपूर तालुक्यातील भोरटेक, भाटपुरा, जापोरे, मांजरोद, पिळोद, घोडसगाव, नांथे, होळ यांसह 11 गावात दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सुमारे 30 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला.
एकेका गावात दीड कोटी पासून आठ कोटी रुपये निधी प्रत्येक गावाला देऊन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी जि.प शाळेला वॉल कंपाऊंड, आदिवासी वस्तीत पेव्हर ब्लॉक, हायमास्ट लाईट, सभामंडप, जलकुंभ, ठक्कर बाप्पा योजनेत रस्ते या स्वरूपाची विविध विकास कामे केली आहेत. त्याचे हे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. ज्या गावांना कधी दहा लाखाचा निधी सुद्धा मोठ्या मुश्किलीने मिळत होता त्या गावांना केंद्र सरकारच्या सहाय्याने कोटी कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. प्रत्येक गावात रस्ते आणि रोजगार देण्याची तळमळ असून ग्रामीण भागाचा विकास हाच आमचा हेतू आहे असे याप्रसंगी खासदार डॉक्टर गावित यांनी प्रत्येक गावातील सभेत सांगितले. केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे असे आवाहन देखील केले. होळ गावात तर आठ कोटी बहात्तर लक्ष रुपय खर्चाच्या सुमारे 40 विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले. .
या भुमिपुजन प्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच यांच्या सह स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
अन्य गावातील कार्यक्रम असे
दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी महासंसदरत्न खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्या हस्ते नंदुरबार लोकसभा मतदार संघातील शिरपूर तालुक्यात भाटपुरा गावात सुमारे 2 कोटी 77 लक्ष 98 हजार रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न.. यात ठक्कर बाप्पा योजनेतून आदिवासी वस्तीत कॉन्क्रीट रस्ता १५ लक्ष, आदिवासी वस्तीत पेव्हर ब्लॉक १० लक्ष, आदिवासी वस्तीत सोलर हायमास्ट १० लक्ष, आदिवासी वस्तीत सोलर हायमास्ट १० लक्ष, पाटील समाज वस्तीत सामाजिक सभाग्रह २१ लक्ष, जि. प. स्तर 15व्या वित्त आयोगातून महादेव मंदिरासाठी सभामंडप ५ लक्ष, भागवत माता मंदिरासाठी सभामंडप ५ लक्ष, शाळा वर्ग खोली १० लक्ष, शाळा वर्ग खोली १० लक्ष, कॉन्क्रीट रस्ता १० लक्ष, प्रा.आ.उपकेंद्र ७२ लक्ष, पाण्याची टाकी ४५.९८ लक्ष, गावांतर्गत फेव्हर ब्लॉक ५ लक्ष, पाणी टँकर ३ लक्ष, श्री. नाना रामदास दोरिक ते मयाराम उदेसिंग राठोड यांच्या शेतापर्यंत रस्ता २२ लक्ष आणि पाणंद रस्ते अशा एकूण 2 कोटी 77 लक्ष 98 हजार रुपयांच्या कामांचा यात समावेश आहे. या भुमिपुजन प्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, पं. स. सदस्य सौ. धनश्री बोरसे, भाटपुराचे लोकनियुक्त सरपंच सौ.ललिता श्रावण चव्हाण उपसरपंच रोशन सुरेश सोनवणे यांच्या सह स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
–
दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी महासंसदरत्न खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्या हस्ते नंदुरबार लोकसभा मतदार संघातील शिरपूर तालुक्यात भोरटेक गावात सुमारे 3 कोटी 81 लक्ष 75 हजार रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.. यात आदिवासी वस्तीत संरक्षण भिंत रक्कम १५ लक्ष, दादाजी मंदिरासाठी सभाग्रह २५ लक्ष, सभामंडप १९ लक्ष, जलजिवन मिशन योजना मधून पाण्याची टाकी २४.७५ लक्ष, भोरटेक ते मुडावद रस्ता २ कोटी ७५ लक्ष आणि रघुनाथ पांडुरंग चौधरी ते रणछोड पंडित पाटील यांच्या शेता पर्यंत पाणंद रस्ता या कामांचा समावेश आहे. या भुमिपुजन प्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, भोरटेकचे लोकनियुक्त सरपंच सौ. ज्योतीबाई सुरेश जाधव, उपसरपंच मच्छिंद्र बळीराम जाधव यांच्या सह स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
महासंसदरत्न खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्या हस्ते 27 फेब्रुवारी 2024 रोजी नंदुरबार लोकसभा मतदार संघातील शिरपूर तालुक्यात मांजरोद गावात सुमारे 1 कोटी 64 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.. यात आदिवासी वस्तीत कॉन्क्रीट रस्ता १५ लक्ष, आदिवासी वस्तीत कॉन्क्रीट रस्ता १५ लक्ष, आदिवासी वस्तीत सोलर हायमास्ट १० लक्ष, तिर्थक्षेत्र विकास १० लक्ष, आयुर्वेदिक उपकेंद्र दुरुस्ती ६ लक्ष, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती ९ लक्ष, कॉन्क्रीट रस्ता १५ लक्ष, सभामंडप १८ लक्ष, स्वामी समर्थ मंदिर १५ लक्ष, पाणी टँकर ३ लक्ष, दत्तात्रय आत्माराम पाटील ते श्री.श्रीराम तुकाराम पाटील यांच्या शेतापर्यंत २४ लक्ष, श्री.मच्छिंद्र महादू गुजर ते लखीचंद सदू गुजर यांच्या शेतापर्यंत पाणंद रस्ते, अशा एकूण रक्कम १ कोटी ६४ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले.
या भुमिपुजन प्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, भोरटेकचे लोकनियुक्त सरपंच गोजरबाई भील , उपसरपंच साखरलाल राजपूत यांच्या सह स्थानिक मान्यवर उपस्थित होते.