शहादा l प्रतिनिधी
लोकनायक जयप्रकाश सूतगिरणी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त लोकशाही पॅनलच्या प्रचारासाठी शहादा तालुक्यातील मोहिदा तश,कहाटूळ , बामखेडा परिसरातील गावांमध्ये सभासद मतदार बांधवांची भेट घेत मतदानाचे आवाहन करण्यात आले.यावेळी मतदारांनी लोकशाही पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आश्वासन दिले.
लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणी लि.उंटावद-होळ ता.शहादा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक जाहीर करण्यात आली आहे.या निवडणुकीत लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त दि.19 रोजी शहादा तालुक्यातील तापी नदीच्या पट्यातील मोहिदा तश, सोनवद तश,कवठळ तश, कहाटूळ, लोंढरे, धांद्रे, निंभोरा, जयनगर, मातकूट, बोराळे, कुकावल, कोठली, वडाळी, खैरवे, बामखेडा तत, फेस, तोरखेडा, दोंद्वाडा, हिंगणी या गावांमध्ये मतदार-सभासद व ग्रामस्थांना भेटून लोकशाही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी लोकशाही पॅनलचे सर्व उमेदवार, स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य, समर्थकांसह विविध सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.मतदार सभासदांसह ग्रामस्थ शेतकरी बांधवांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेण्यात आली तसेच लोकशाही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.विविध गावात महिलांनी प्रचारफेरी दरम्यान उमेदवार व प्रमुखांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या.