शहादा l प्रतिनिधी
लोकनायक जयप्रकाश सूतगिरणी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत लोकशाही पॅनलच्या प्रचारासाठी शहादा-तळोदा तालुक्यासह गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये सभासद मतदार बांधवांची भेट घेत मतदानाचे आवाहन करण्यात आले.विद्याविहार(मोहिदा तह.) येथील महिलांनी प्रचारफेरी काढून लोकशाही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले.
लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणी लि.उंटावद-होळ ता.शहादा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त दि.17शनिवार रोजी शहादा-तळोदा तालुक्यातील धुरखेडा,भादा, काथर्देदिगर, वैजाली, नांदर्डे,करणखेडा,खरवड,बोरद,मोड,मोरवड,तळवे,खेडले,तरावद,आमलाड,गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या बहुरूपा ,बाळदा,निंभोरा, धानोरा या गावांमध्ये मतदार-सभासद व ग्रामस्थांना भेटून लोकशाही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी लोकशाही पॅनलचे उमेदवार, स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य, समर्थकांसह विविध सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.मतदार बांधवांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेण्यात आली तसेच लोकशाही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, विद्याविहार मोहिदा तह.येथील महिला तसेच ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांनी लोकशाही पॅनलच्या प्रचारासाठी फेरी काढून मतदानाचे आवाहन केले.यावेळी उमेदवारांसह समर्थकांनी सातपुडा साखर कारखान्याच्या माजी चेअरमन श्रीमती कमलताई पुरूषोत्तम पाटील,चेअरमन दीपकभाई पुरूषोत्तम पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीबेन (कंचनबेन) दीपक पाटील,माधवीबेन मकरंद पाटील यांची भेट घेतली.