Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंतप्रधान विश्वकर्मासारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा: मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित

team by team
February 21, 2024
in राजकीय
0
पंतप्रधान विश्वकर्मासारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा: मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित

 

नंदुरबार l प्रतिनिधी
आरक्षणाचे आणि सरकारी नोकरीचे लाभ मिळवण्यात गुंतून अन्य सर्व समाज घटक आपलं मूळ पारंपरिक कौशल्य विसरले. मात्र, बांधकाम करणे, लाकूड काम-लोखंड काम करणे, नक्षीदार रचना निर्माण करणे, शेती अवजारे बनवणे यात आघाडीवर राहणाऱ्या सुतार समाजाने पारंपारिक कौशल्य टिकवून ठेवले हे कौतुकास्पद गोष्ट आहे. अशा प्रत्येक लहान समाज घटकांना विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणण्याचा मूळ उद्देश असून पंतप्रधान विश्वकर्मासारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा; असे आवाहन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

 

 

 

नंदुरबार शहरातील भोणे वळण रस्त्यावरील सुतार समाजाच्या नियोजित सामाजिक भवनाचे भूमिपूजन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते आणि खा.डॉ. हिना गावित व जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री आठ वाजता संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

 

 

 

 

 

या सोहळ्याला सुतार समाजाचे अध्यक्ष वाल्मिक जगताप, सोमनाथ सुतार, नामदेव सूर्यवंशी, आत्माराम बोरसे, महेंद्र हिरे, दादाभाई बोरसे,मुकेश सुर्यवंशी, हिरालाल गवळे, रवी बोरसे, सुभाष सूर्यवंशी, दौलत सूर्यवंशी, चेतन सोनवणे, वसंत बोरसे, नथू मिस्त्री, सुनील बोरसे, हर्षल खैरनार, ज्ञानेश्वर गवळे, पिन्टू सुतार, कन्हैया जगताप आदी उपस्थित होते. मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सुतार समाज भवन उभारणीसाठी दोन कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी मिळवून दिली असून महाराष्ट्रात प्रथमच सुतार समाजभावनासाठी एवढा मोठा निधी मंजूर झाल्याचे उपस्थितांमधून सांगण्यात आले.

 

 

 

 

याप्रसंगी प्रमुख भाषणात मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, पूर्वी गावाचा कारभार बारा बलुतेदारांवर अवलंबून होता आणि त्या सर्व समाजापैकी सुतार समाज हा एक प्रमुख घटक होता. आजही नक्षीदार मंदिर निर्मिती असो, शेती अवजारे बनवण्याचे उद्योग असो, किंवा बांधकाम क्षेत्र असो सुतार समाज अग्रेसर असतो. अशा घटकांच्या प्रगतीचा विकासाचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक समाजाला न्याय मिळेल याची दक्षता घेतली. आपण सर्वांनी एकोप्याने राहावे आपले सर्वांची प्रगती आणि विकास व्हावा ही यामागची तळमळ आहे.

 

 

 

जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी भाषणात सांगितले, सुतार समाजातील तरुण लाकूड काम शेती अवजार बनवणे ॲल्युमिनियम सेक्शन बनवणे यासारख्या उद्योगात प्रगती करू इच्छित असतील त्या सर्वांना सुवर्णसंधी आहे आधुनिक यंत्राच्या माध्यमातून ते प्रगती करू शकतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यासाठी प्रशिक्षणाची सोय असून गरजू तरुणांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे.
डॉ. विजयकुमार गावित यांनी याप्रसंगी भाषणात सांगितले की, केवळ रस्ते गटारी पाणी व्यवस्था एवढ्या पुरताच विकास निधी वापरावा हा पारंपारिक दृष्टिकोन मोदी सरकारने बदलवून टाकला आहे.

 

 

 

 

या मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच समाज घटक एकत्र कसे येतील आणि त्या प्रत्येकाच्या घरापर्यंत लाभ कसे पोहोचतील याचे प्रयत्न आम्ही करीत आहेत आणि म्हणूनच समाज भवन उभारणीसाठी प्रत्येक समाजाला दोन दोन कोटी रुपये भरीव निधी देण्याचे प्रयोजन आम्ही केले. मोदी सरकारने विश्वकर्मा योजना अमलात आणली असून विश्वकर्मासारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा; असेही आवाहन खा. डॉ. हिना गावित यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांचा नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

Next Post

लवकरच स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली स्त्री बँक स्थापन करु: खा. डॉ. हिना गावित यांची घोषणा

Next Post
लवकरच स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली स्त्री बँक स्थापन करु: खा. डॉ. हिना गावित यांची घोषणा

लवकरच स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली स्त्री बँक स्थापन करु: खा. डॉ. हिना गावित यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add