नंदुरबार l प्रतिनिधी-
रोजगारासाठी स्थलांतर होवू नये हा निर्धार असून महिलांना रोजगार देणारे, जोडधंदे देणाऱ्या, वृद्धांना पेन्शन देणाऱ्या केंद्राच्या धर्तीवर राज्यानेही योजना आणल्या आहेत. शहादा तालुक्यात 1हजार 500 लाभार्थ्यांना गायी वाटप तसेच 180 वन पट्टे धारकांना गायी, शेळ्या वाटप येत्या आठवडाभरात केल्या जाईल; असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.
शहादा तालुक्यातील कहाटूळ जिल्हा परिषद गटात कुकावल, कोठली त.सा., कोंढावळ, खापरखेडा, बामखेडा त.त., भडगांव, दोंदवाडे, तोरखेडा, हिंगणी, अभणपुर, वडाळी इत्यादी गावांमधील समाज मंदिर रस्ता काँक्रिटीकरण ठक्कर बाप्पा योजनेतून रस्ता पाणी योजना आणि तत्सम कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सौ. हेमलताताई शितोळे ( सभापती जि. प. नंदुरबार), श्री. विरसिंगदादा ठाकरे, (सभापती पं स.शहादर), जिल्हा परिषद सदस्य वृंदा नाईक, श्री जयवंत निळकंठ पाटील (सरपंच), ईश्वर पाटील, शशिकांत पाटील, कहाटूळचे विजय पाटील, आर आर बोरसे, सुनील पाटील आणि सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व समस्त ग्रामस्थ मंडळीमंडळी उपस्थित होते.
ग्रामपंचायत बामखेडा त.त. येथील ५ कोटी १६ लक्ष निधीतुन विविध विकास कामांचा भुमिपुजन व लोकार्पण सोहळा करण्यात आला. जलजिवन मिशन अंर्तगत नळ पाणी पुरवठा योजना २.२२ लक्ष, आमदार स्थानिक निधी कार्यक्रम अंर्तगत कामे १९ विद्युत पोल व ६३ के.व्ही. चे विद्युत ट्रान्सफार्मर बसविणे खैरखे गावठाण फिडर १० लक्ष, सामाजिक सभागृह बांधकाम करणे (मिरा नगर) २० लक्ष, सामाजिक सभागृह बांधकाम करणे (वडार वस्ती जवळ) २० लक्ष, समाज भवन (नाभिक वस्ती जवळ ) २० लक्ष, पाणी साठवण बधांरा (जि.प. लघुसिंचन विभाग) १३ लक्ष, पाणी साठवण बधांरा (लघुपाटबंधारे विभाग, धुळे नंदुरबार १६ लक्ष, गोबरधन प्रकल्प योजना जि.प. नंदुरबार ४० लक्ष, २५१५/१२३८ लेखाशिर्ष अंतर्गत समाज मंदिर व रस्ता कॉक्रीटी करण करणे ३५ लक्ष, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, एकलव्य गल्ली रस्ता क्रॉक्रीटी करण करणे १५ लक्ष,मरीमाता चौक व गल्ली रस्ता क्रॉक्रीटी करण करणे १५ लक्ष अशा विविध कामांचा यात समावेश आहे.
बेघरांनी घरकुलांचा, महिलांनी गॅस वाटपाचा तसेच बचत गटाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या रोजगार योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करून मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी याप्रसंगी युवकांसाठी क्रिकेट किट आणि भजनी मंडळांसाठी भजनी साहित्य वाटप करणार असल्याचेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी घोषित केले.