नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथे संत सेवालाल महाराज जयंती निमित्त जयंतीच्या पूर्वसंध्येला बंजारा समाजातर्फे शहरातील मोठा मारुती मंदिर परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.
येथील मोठा मारुती मंदिर येथून संत सेवालाल महाराज जयंती निमित्त बंजारा समाजातर्फे शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेच्या शुभारंभ प्रसंगी संत तारादास बापू यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढविले. याप्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, अखिल भारतीय बंजारा क्रांतीदलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण, भावेश पवार, उपसभापती तेजस पवार, युवराज चव्हाण, डॉ. गणेश चव्हाण, प्रेम चव्हाण, चैत्राम राठोड, किसन पवार,धर्मा राठोड, शामा मिस्त्री, दिवाणसिंग बंजारा यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील मोठा मारुती मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली प्रमुख मार्गावरून नेहरू पुतळा येथे शोभायात्रेच्या समोर करण्यात आला तेथून तालुक्यातील बंद्रीझीरा येथील श्रीराम मंदिरात समारोप करण्यात आला.
शोभायात्रेत पारंपारिक पद्धतीने समाज बांधवांनी सहभाग नोंदविला यावेळी जय सेवालाल, तसेच समाजाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शोभायात्रेत समाजाच्या पारंपारिक गाण्यावर संस्कृतीचे दर्शन घडवीत नृत्य सादर करण्यात आले