नंदुरबार l प्रतिनिधी-
मुंबई येथे १० फेब्रुवारी रोजी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नंदुरबारचे नगरसेवक आरीफ कमर शेख सह नंदुरबार जिल्ह्यातील शंभर विविध पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला.
यावेळी सर्वांना राष्ट्रवादी चे रुमाल देवून स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल भाई पटेल. राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कुषी मंत्री धनंजय मुंडे. क्रिडामंत्री, संजय बनसोडे.
महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे. मुंबई अध्यक्ष पंकज भुजबळ. अल्पसंखाक राष्ट्रीय अध्यक्ष अँड.जलालोदिन सैय्यद प्रदेश अध्यक्ष इलियास नाईकवाडी. राष्ट्रीय सरचिटणीस ताहीर बेग मिर्झा नंदुरबार जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष व नगरसेवक सेवक खलील खाटीक सह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थितीत होते.
यावेळी माजी मंत्री बाबा सिद्दिकी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील नगरसेवक आरीफ शेख सह ता., अक्कलकूवा नवापूर शिरपुर धूळे सह शंभर कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच महाराष्ट्रातील नगरसेवक माजी नगरसेवक आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध पदाधिकारी तसेच मुंबई शहरातील व महाराष्ट्रातील सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांनी माजी मंत्री बाबा सिद्दिकी सोबत प्रवेश केला प्रमुख पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले.