Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सैन्यदलातील अधिकारी पदाच्या परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

team by team
January 25, 2024
in राष्ट्रीय
0
सैन्यदलातील अधिकारी पदाच्या परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी-

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेची पूर्व तयारीसाठी नवयुवक व नवयुवतींसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

शासनातर्फे नवयुवक व नवयुवतीसाठी 01 फेब्रुवारी 2024 ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) सत्र क्र. 62 चे  आयोजन करण्यात आले असून या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन देण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10-30 वाजता मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभाग, पुणे (डीएसडब्लू) यांच्या संकेतस्थळावरील सत्र क्र. 62 साठी असलेले प्रवेशपत्र व त्यासोबतची परिशिष्टे पूर्ण भरुन सोबत आणावी. या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, तसेच उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. या परीक्षेसाठी आनलाईन अर्ज केलेला असावा.

याबाबत अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक ईमेल पत्ता training.petenashik@gmail.com  व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हाटसअॅप क्र. 9156073306 अथवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

एकलव्य निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करावे : मंदार पत्की

Next Post

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत 50 शाळेत चित्रकला स्पर्धा उत्साहात

Next Post
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत 50 शाळेत चित्रकला स्पर्धा उत्साहात

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत 50 शाळेत चित्रकला स्पर्धा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add