Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देसाईपुऱ्यातील सव्वाचारशे वर्षांपूर्वीचे संतांचे श्रीराम मंदिर ना. गावित यांच्या हस्ते अनेक वर्षानंतर झाले खुले

team by team
January 21, 2024
in राजकीय
0
देसाईपुऱ्यातील सव्वाचारशे वर्षांपूर्वीचे  संतांचे श्रीराम मंदिर ना. गावित यांच्या हस्ते अनेक वर्षानंतर झाले खुले

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील देसाई पुरा भागात सुमारे सव्वाचारशे वर्षांपूर्वीचे संतांचे श्रीराम मंदिर शनिवारी आदिवासी विकास मंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उघडण्यात आले.
सोमवारी अयोध्या येथे श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देश भरातील सर्व मंदिरांमध्ये शनिवार पासून स्वच्छता अभियान सुरू आहे.

त्यानुसार नंदुरबार शहरातील विविध मंदिरांमध्ये देखील स्वच्छता अभियान राबविण्यात आले. देसाईपुरा भागात सुमारे सव्वा चारशे वर्षपासून उभारण्यात आलेले पुरातन संतांचे श्रीराम मंदिर शनिवारी ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उघडण्यात आले. अयोध्येतील भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला प्रतिसाद म्हणून आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार शहरातील विविध मंदिरात जाऊन स्वतः स्वच्छता अभियान राबविले.

त्याचबरोबर महा संसदरत्न खा. डॉ. हिना गावित यांच्या संकल्पनेतून नंदुरबार शहरातील सर्व मंदिरांना विद्युत दिव्यांच्या माळा आणि महाप्रसाद मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मंदिर संस्थांनच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आला. दरम्यान मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सर्वात जुन्या श्री संतांचे राम मंदिराची माहिती जाणून घेतली.मंदिरात प्रवेश केल्याबरोबर ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी पुरातन श्रीराम मंदिराच्या वास्तूची पाहणी केली.तसेच मंदिराच्या गाभार्‍यात स्वस्ते स्वच्छता अभियान राबविले. त्यानंतर मंदिराचे ट्रस्टी मुकेश टिल्लू यांना डॉ. गावित यांच्या हस्ते मंदिरावर करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाई संच सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मंदिराचे प्रमुख ट्रस्टी मुंबई येथील मुकेश टिल्लू, हेमलता टिल्लू, शलाखा फडके,तसेच नंदुरबार येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश देसाई, शहिद शिरीषकुमार मित्र मंडळाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त सविता जयस्वाल,भाजपाचे माजी नगरसेवक अर्जुन मराठे,आनंद माळी,लक्ष्मण माळी, रमेश चौधरी, निलेश चौधरी, प्रशांत चौधरी आदींसह देसाईपुरा भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी स्वतः केली विविध मंदिरात स्वच्छता; पंतप्रधानांची राबवली संकल्पना

Next Post

नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add