नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील हरिभाऊ नगर मध्ये प्रभू श्रीराम मंदिर अक्षदा वाटप निमित्त बैलगाडीवरून शोभायात्रा काढण्यात आली. परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला.
नंदुरबार येथील हरिभाऊ नगर मध्ये प्रभू श्रीराम मंदिर अक्षदा वाटप व प्रतिमा वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यानिमित्त प्रभू श्रीरामाची प्रतिमा बैलगाडीवरून कॉलनी परिसरात शोभायात्रेनिमित्त वाजत गाजत फिरविली. यावेळी परिसरातील जवळपास ३५० घरांमध्ये अक्षदा व प्रतिमा वाटप करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीराम चंद्राचे जयघोष करण्यात आला. शोभा यात्रेनिमित्त घरोघरी प्रतिमा पूजन करण्यात आले .२२ जानेवारीला घरोघरी दिपोत्सव रांगोळ्या काढणे मंदिरावर दिवे लावणे यासह विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
याप्रसंगी गोपाळ बूनकर, प्रखंड सहमंत्री तसेच श्री.सोनी,जयपाल गिरासे,अरुण कायस्थ यांनी मार्गदर्शन केले. परिसरातील महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते.