Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा : प्रफुल्ल उमरे

team by team
January 17, 2024
in राजकीय
0
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा : प्रफुल्ल उमरे

नंदुरबार l प्रतिनिधी

 

शहरी तथा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजना राबविण्यात येत आहे.पारंपारिक शिल्प कारागीर आणि व्यावसायिकांमधील बारा बलुतेदार पद्धत आता 18 झाली आहे.खादी ग्रामोद्योग आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येईल.असे प्रतिपादन एमएसएमई मंत्रालय मुंबईचे सहाय्यक निर्देशक प्रफुल्ल उमरे यांनी व्यक्त केले.

 

 

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत सूक्ष्म लघु व मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात एक दिवशीय कार्यशाळा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे होते. मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे म्हणाले की बारा बलुतेदार पद्धतीत बदल होऊन आता मूर्तिकार व परंपरागत कला व्यवसाय यांचा समावेश झाला आहे.

 

 

 

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी लाभ घेऊन बेरोजगार तरुणांनी स्वावलंबी होण्याचे आवाहन गोगटे यांनी केले.या एकदिवसीय कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक सचिन गांगुर्डे, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे, शहरी विकास प्राधिकरण सह आयुक्त नितीन कापडणीस, नंदुरबार नगर पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी उपस्थित होते.याप्रसंगी सहाय्यक आयुक्त विजय रीसे यांनी कौशल्य विकास संदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.जिल्हा ग्रामीण बँकेचे महा व्यवस्थापक सचिन गांगुर्डे यांनी उपस्थित लाभार्थ्यांच्या कर्ज योजना संदर्भातील अडचणी संदर्भात समर्पक माहिती दिली.

 

 

 

 

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत पारंपरिक व्यापाऱ्यांमध्ये असलेले कारागिर सुतार, गवंडी, सोनार (दागिने कारागीर) शिल्पकार (दगड फोडणारे) लोहार, चर्मकार, कुंभार, बोट बांधणारे, न्हावी, हत्यारे व अवजारे बनवणारे, धोबी, विणकर कामगार, माळी( फुल कारागीर) खेळणी बनवणारे, शिंपी, कुलूप बनवणारे, मासे पकडण्याची जाळी बनवणारे, चिलखत शस्त्रे बनवणारे आदींचा समावेश आहे.सुत्रसंचलन आर.बि. गंवादै यांनी तर आभार योगेश बधान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी, ज्येष्ठ सहाय्यक आर.बि. गवांदे,उद्योग पर्यवेक्षक योगेश बधान, वसंत गावित, कनिष्ठ सहाय्यक निलेश बोरसे, शिपाई श्रीमती एस. के. पाटील आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

२५०-३०० वर्षांपूर्वीची पुरातन तोफेची दुरावस्था थांबवून तोफ सन्मानाने ठेवावी: हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Next Post

तोरखेडा ते शिर्डी पालखी पदयात्रेचे बुधवारी प्रस्थान

Next Post
तोरखेडा ते शिर्डी पालखी पदयात्रेचे बुधवारी प्रस्थान

तोरखेडा ते शिर्डी पालखी पदयात्रेचे बुधवारी प्रस्थान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add