Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजूर कामांची उच्च न्यायालयाने उठवली स्थगिती : शिवसेना नेते,माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

team by team
January 15, 2024
in राजकीय
0
पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजूर कामांची उच्च न्यायालयाने उठवली स्थगिती : शिवसेना नेते,माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजुर झालेल्या कामांची उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली दिली आहे.त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील साडेसाती मुक्ती श्रीक्षेत्र शनिमांडळचा विकास होणार असून,त्यासाठी ३ कोटी ९ लाख ९३ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

याबाबत माजी आ.रघुवंशी यांनी सोमवारी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही निविदांना तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे कामांना स्थगिती देण्यात आली होती. परंतु, आता उच्च न्यायालयाच्या आदेशाने सरसकट संगती उठवण्यात आलेली आहे.

कामात कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या एकमेव साडेसाती मुक्तीपीठ श्रीक्षेत्र शनिमांडळ येथे पर्यटन विकास विभागाकडून विकास कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.त्यामुळे शनी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही तांत्रिक मुद्द्यांमुळे कामांच्या निविदांना स्थगिती देण्यात आली होती त्यामुळे विकास कामे होऊ शकली नाहीत आता उच्च न्यायालयानेच स्थगिती उठवल्यामुळे विकास कामे होतील. शनिमांडळ गावातील नदी ते शनी मंदिर पर्यंत ट्रीमिक्स पद्धतीने रस्ता तयार करणे,मंदिर चौक सिमेंट ट्रीमिक्स करणे त्याचप्रमाणे गावातील रस्त्यांवर पथदिवे बसवण्यात येतील त्यासाठी ३ कोटी ९ लाख ९३ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे राष्ट्रवादी पाच हजार पतंगाचे वाटप

Next Post

बोरद येथे कलश शोभा यात्रेचे महास्वागत

Next Post
बोरद येथे कलश शोभा यात्रेचे महास्वागत

बोरद येथे कलश शोभा यात्रेचे महास्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add