म्हसावद । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष पदी नंदुरबार येथील दिपीका बाळासाहेब मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील,खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहीणी खडसे यांच्या शिफारशीनुसार महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मंजुळा पाडवी यांनी दिपीका मोरे यांना नियुक्ती पत्र दिले.








