नंदुरबार l प्रतिनिधी
ग्राहक पंचायतचे संस्थापक, ग्राहकतीर्थ स्व. बिंदूमाधव जोशी यांच्या संकल्पेनेतून उदयास आलेला चातुर्मासाचे नंदुरबार जिल्ह्यातर्फे नुकतेच आयोजन करण्यात आले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र आयोजित हा कार्यक्रम दर रविवारी आँनलाईन युट्युब, फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारित करण्यात येतो. त्या कार्यक्रमाचाच भाग म्हणून 11वे पुष्प नाशिक विभागातील नंदुरबार जिल्ह्याला आयोजित व प्रसारित करण्याचा मान मिळाला. हा कार्यक्रम नंदुरबार जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कार्यकारिणीने मोठ्या उत्साहात साजरा केला.
ह्या कार्यक्रमाची सुरुवात विभागीय अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलित करून केले. प्रास्ताविक विभागीय कोषाध्यक्ष ॲड. राजेंद्र खंदारे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय व स्वागत नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष तथा नाशिक विभागाचे सहसचिव प्रा.डॉ. ए.बी.महाजन यांनी केले. तर जिल्हा सचिव श्रीकांत पाठक व जिल्हा संघटक प्रा. आर. ओ.मगरे. यांनी प्रमुख अतिथी व वक्ते यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून नवापूरचे तहसीलदार मंदार कुळकर्णी हे होते. त्यांनी संगणकीय 7/12 व त्यावरील नोंदी याविषयीची सखोल माहिती दिली. तर प्रमुख वक्ते अँड मोहन बोडस यांनी सध्या अनेकांना भेडसावणारा प्रश्न बँक खात्यातील व्यवहारात होणारी फसवणूक यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ विषयी सखोल माहिती देऊन आपण बॅंक व्यवहार करतांना कोणती काळजी घ्यावी, याचे विवेचन केले. कार्यक्रमाचेअध्यक्ष म्हणून राज्य सहसंघटक सौ.मेधाताई कुळकर्णी होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांना वाहिलेली आदरांजली होय. या भव्य दिव्य कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शहादा येथील महिला काँलेजच्या प्राचार्या डॉ.मालिनी आढाव-निकुंभ यांनी केले. आभार प्रदर्शन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तळोदा तालुकाध्यक्ष अशोक सुर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड, राज्य सचिव अरूण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव, विभागीय अध्यक्ष डॉ.अजय सोनवणे, संघटक संजय शुक्ल, अँड. सुरेंद्र सोनवणे, ॲड.खंदारे, महेश चावला, धुळे जिल्हाध्यक्ष ॲड. जे. टी.देसले आदींनी मार्गदर्शन केले, तर नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष किर्तीकुमार शहा, नवापूर तालुकाध्यक्ष विजय चव्हाण, शहादा तालुकाध्यक्ष उदय निकुंभ, नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, तळोदा तालुकाध्यक्ष अशोक सुर्यवंशी, वासुदेव माळी, विजय बागुल, प्रा.ए.ए.मुळे, प्रा.एच.बी.सरतापे, प्रभाकर शिरसाठ, प्रा. राहुल तुपे इ.नी मार्गदर्शन करुन तसेच विशेष योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास तळोद्याहून अँड. जयेश शहा.अँड. अल्पेश जैन,प्रवासी महासंघाचे राजेश चौधरी, रमेशकुमार भाट,अँड दीपक वाणी यांच्यासह संपूर्ण राज्यातून साधक रसिकांनी सहभाग नोंदविला. ग्राहक प्रबोधनाच्या दृष्टीने उत्कृष्ठ आणि उपयुक्त माहिती मिळाल्याच्या प्रतिसाद साधक व श्रोत्यांकडून मिळाला. कैलास लोहार यांनी पसायदान सादरीकरण करुन कार्यक्रमाची सांगता झाली.