Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहनधारकांनी, अनुज्ञप्ती धारकांनी अभिलेख्यांचे संगणकीकरण करुन घ्यावे : किरण बिडकर

team by team
January 6, 2024
in राज्य
0
वाहनधारकांनी, अनुज्ञप्ती धारकांनी अभिलेख्यांचे संगणकीकरण करुन घ्यावे : किरण बिडकर

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील वर्ष 2007 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहधारक व अनुज्ञप्ती धारक यांनी आपल्या अभिलेख्यांचे संगणकीकरण करुन घ्यावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

वर्ष 2007 पूर्वी नोंदणी झालेली वाहने व ड्रायव्हींग लायसन्स यांच्या हस्तलिखीत अभिलेखाचे संगणकीकरण करण्याचे कामकाज उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे करण्यात येत असून वाहनाचा व लायसन्सचा अभिलेख संगणकीय प्रणालीवर उपलब्ध झाल्यावर सर्व वाहन धारकांना व वाहन चालकांना ऑनलाईन व फेसलेस सुविधांचा लाभ घेता येईल. कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाईन शुल्क भरणा करुन ड्रायव्हींग लायसन्सचे नुतनीकरण, दुय्यम प्रत तसेच वाहनाचा कर भरणा, वाहन हस्तांतरण व अन्य सेवा वाहन धारकांना उपलब्ध होतील.

जिल्ह्यातील सर्व वाहन धारकांनी आपल्या वाहनांचे मुळ नोंदणी प्रमाणपत्र, विमा, आधार कार्ड, चेसीस क्रमांकाची पेन्सील प्रिंट, मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे कार्यालयीन अधिक्षक यांचेकडे जमा करुन आपल्या वाहन अभिलेखाचे संगणकीकरण करुन घ्यावे. तसेच 2007 पूर्वीच्या अनुज्ञप्ती धारकांनी आपले हस्तलीखीत स्वरुपातील ड्रायव्हींग लायसन्स, आधार कार्ड, मोबाईल इ. सह लायसन्स विभागात संपर्क करावा ही सेवा पूर्णतः निशुल्क आहे.

तसेच सन 2007 नंतर वाहनाची नोंदणी झाली असेल अथवा स्मार्टकार्ड ड्रायव्हींग लायसन्स असेल तर अशा वाहनधारकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास संपर्क साधण्याची आवश्यकता नाही असेही श्री. बिडकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानाबाबत श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे मार्गदर्शन

Next Post

रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

Next Post
रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add