Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तेजोमय किरणांना सूर्यनमस्काराने नमन करीत ७०० विद्यार्थ्यांनी केले नवीन वर्षाचे स्वागत

team by team
January 2, 2024
in शैक्षणिक
0
तेजोमय किरणांना सूर्यनमस्काराने नमन करीत ७०० विद्यार्थ्यांनी केले नवीन वर्षाचे स्वागत

नंदुरबार l प्रतिनिधी

सूर्य तेजाची शक्ती आणि ऊर्जा घेऊन अखंड वर्षभर चैतन्याने विविध आव्हानांना लिलया पेलता येण्याचा संकल्पम्हणून नव वर्षारंभाला सूर्यनमस्कार घालून सुर्यकिरणांना अभिवादन करण्याचा उपक्रम येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवला.

या प्रेरणादायी शालेय उपक्रमाला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार ,संस्थेचे चेअरमन ॲड.रमणलाल शाह,सचिव डॉ.योगेश देसाई, मुख्याध्यापक सुषमा शाह, मनीष शाह, माजी मुख्याध्यापक पूनम गिरी, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, मीनाक्षी भदाणे याप्रसंगी उपस्थित होते. सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावर सूर्यनमस्कार घालून पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यकिरणांना प्रणाम केले.शाळेच्या मुख्याध्यापक सुषमा शाह यांनी, संयम व जिद्दीने
सुर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा संकल्प वर्षारंभाला निरंतरपणे करतो आहोत.सूर्यनमस्कार विद्यार्थी जीवनाचा अभिन्न भाग व्हावा म्हणून प्रेरणा देणारा हा उपक्रम असल्याचे प्रस्ताविकेतून सांगीतले.

कार्यकमाचे प्रमुख अतिथी,एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी भारतीय योग विद्येला जगाने स्वीकारले आहे. शारीरिक मानसिक विकास,चित्त एकाग्रता, विविध ग्रंथी सक्रिय होण्यासाठी सूर्यनमस्कार आवश्यक आहे.

हा स्तुत्य उपक्रम श्राॅफ हायस्कूलने राबवून प्रेरणादायी कार्य निरंतर सुरू ठेवल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. या भव्य कार्यक्रमासाठी मैदान व सुर्यस्तंभ आरेखन हेमंत पाटील, शिवाजी माळी ,फलक सजावट महेंद्र
सोमवंशी यांनी केले. संगीत संयोजन अनघा जोशी,संस्कृत सूर्य श्लोक योगेश शास्त्री यांनी गायले.ओमकार पठण जगदीश वंजारी तर उद्घघोष भिकू त्रिवेदी यांनी केला. हेमंत पाटील यांनी बासरी वरील संगीताची साथ दिली. सूत्रसंचालन चेतना पाटील तर आभार उपमुख्याध्यापक राजेश शाह यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक राजेश शाह,पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा पोलीस दलाकडून उघड्यावर राहणाऱ्या निराधारांना ब्लेंकेटचे वाटप

Next Post

दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू कराव्या, शेतकऱ्यांचे निवेदन

Next Post
दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू कराव्या, शेतकऱ्यांचे निवेदन

दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू कराव्या, शेतकऱ्यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add