नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांची नंदुरबार जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्यांची नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्ती बद्दल नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातर्फे अभिनंदन करण्यात येत असून,
राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांची जिल्हा प्रशासनाने नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे जिल्हा प्रशासनातर्फे तसेच नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.








