Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तहसीलमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

team by team
December 27, 2023
in राज्य
0
नंदुरबार तहसीलमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी

24 डिसेंबर 1686 रोजी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून भारतात सजरा करण्यात येतो. सालाबादाप्रमाणे यावर्षीही 24 डिसेंबर हा दिवस शासन आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय नंदुरबारच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी याठिकाणी अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार, कल्याणी गॅस एजन्सी, नंदूरबार आदी स्टॉलचे उद्घाटन तहसीलदार नितीन गर्जे, नायब तहसीलदार रमेश वळवी, नायब तहसीलदार राजेश अमृतकर, यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित सहाय्यक पुरवठा अधिकारी चौरे मॅडम, रवींद्र. घोडके, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा संघटक वासुदेव माळी, नंदुरबार तालुका सचिव गोरखनाथ बावा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना तहसीलदार नितीन गर्जे यांनी ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, ग्राहक म्हणून आपल्याला आपल्या हक्कांची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच, आपल्याला ग्राहक हक्कांवर आधारित आपली खरेदी करणे आवश्यक आहे.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा संघटक वासुदेव माळी यांनी ग्राहकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नेहमीच साथ देईल असे सांगितले.

यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नंदुरबार तालुका सचिव गोरखनाथ बावा यांनी ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच मान्यवर व उपस्थित नागरिकांचे सहाय्यक पुरवठा अधिकारी चौरे मॅडम यांनी आभार व्यक्त केले.या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे रस्त्याच्या काँक्रीटकरण कामाचे मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

सांरगखेड्याचा अश्व महोत्सव देशात आगळावेगळा : गिरीश महाजन

Next Post
सांरगखेड्याचा अश्व महोत्सव देशात आगळावेगळा : गिरीश महाजन

सांरगखेड्याचा अश्व महोत्सव देशात आगळावेगळा : गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add