नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे गाव अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटकरण कामाचे भूमिपूजन मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नंदुरबार तालुका विधायक समितीचे सरचिटणीस यशवंत पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी नंदुरबार नगर परिषद पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश पाटील भालेरच्या सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच गजानन पाटील, नगाव ,तिसीचे सरपंच, भालेर विकास सोसायटीचे चेअरमन हिम्मतराव पाटील आदी उपस्थित होते .
डी.डी.सी बँक ते इंदिरा आवासास जोडणाऱ्या रस्त्यावर काँक्रिटीकरण येणार आहे या कामासाठी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत करण्यात येणार आहे. यावेळी भालेर, नगाव,तिसी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.









