Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत : सी.के. ठाकरे

team by team
December 21, 2023
in राज्य
0
प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत : सी.के. ठाकरे

नंदुरबार l प्रतिनिधी

राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजनेच्या वर्ष 2023-24 मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी.के. ठाकरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजना वर्ष सन 2023-24 साठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व बहुभूधारकांना 45 टक्के अनुदान देण्यात येते. अनुसुचित जाती व अनुसूचीत जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांती योजने 35 टक्के व 45 टक्के पुरक अनुदान देय असल्याने पात्र असलेल्या शेतकऱ्यांना मंजुर मापदंडाच्या 90 टक्के  मर्यादेत अनुदान देण्यात येते.

वर्ष 2023-24 मध्ये जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता रुपये 12 लाख  व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी रुपये 275 लाख 61 हजार निधी शिल्लक आहे. सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या अनु.जाती व अनु.जमाती लाभार्थ्यांचे अर्जाचे प्रमाण कमी असल्याने अर्ज नोंदणीसाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.

अर्ज रद्द होणार नाही यासाठी अचुक माहीती भरावी. अर्ज करतांना सातबारा, 8 अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आवश्यक असून आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असावी. नोंद नसल्यास विहीर, शेततळे याबाबत स्वयं घोषणापत्र देण्यात यावे. योजनेचा लाभ 5 हेक्टर पर्यंत देण्यात येईल. आलेल्या अर्जातून महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत काढण्यात येईल व निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना लघु संदेशाव्दारे कळविण्यात येईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीचे आणि अधिकृत वितरकांकडुन संच खरेदी करता येईल. संच बसविल्यानंतर कृषि पर्यवेक्षकामार्फत मोका तपासणी होवुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होईल.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी अर्ज नोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा. या मोहिमेदरम्यान कृषी विभागातील मंडळ कृषि अधिकारी व कृषि पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कृषि सहाय्यक प्रत्येक गावात मेळावे आयोजित करुन योजनेची माहिती देणार आहेत.  अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व सीएससी केंद्रावर संपर्क साधावा, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकरे यांनी या  प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्याचा प्रयत्न करणारे दोन ताब्यात, वाहनासह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण

Next Post
सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण

सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add