Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दणका

team by team
December 20, 2023
in क्राईम
0
गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दणका

नंदुरबार l प्रतिनिधी

गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढण्याचे तसेच रात्रीच्यावेळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांच्या मागून येत दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज करणे, शिवीगाळ करणे इत्यादी प्रकार काही टवाळखोर युवकांकडून होत असल्याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या.

त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुध्द् पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार यांचे एक पथक तयार करुन टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद् कारवाई करण्याबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.

त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील नेहरु चौक, डी. आर. हायस्कूल परिसरात- 8, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील उड्डानपुल, सिंधी कॉलनी परिसरात 5, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे-2, विसरवाडी पोलीस ठाणे 2 असे एकुण 17 युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना तसेच नागरिकांना त्रास देणाऱ्या टवाळखोर युवकांना संबंधीत पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तसेच सदर युवकांनी यापुढे अशा प्रकारचे कृत्य केले तर त्यांच्या पालकांना संबंधीत पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना त्यांच्या पाल्याच्या कृत्याबद्दल समज देवून त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. तसेच पुन्हा त्या युवकांनी तिसऱ्या वेळेस देखील अशा प्रकारचे कृत्य केले तर त्यांच्याविरुद् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

टवाळखोर युवकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली असून अशा टवाळखोर युवकांविरुध्द् कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व
पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत. सदरची मोहिम यापुढे अजून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्ये करण्यापासून परावृत्त करावे तसेच गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढणारे. व रात्रीच्यावेळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांच्या मागून येत दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज करणारे, शिवीगाळ करणाऱ्याची माहिती तात्काळ डायल-112 वर द्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दल व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील यांनी सर्व पालकांना केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्याचा प्रयत्न करणारे दोन ताब्यात, वाहनासह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्याचा प्रयत्न करणारे दोन ताब्यात, वाहनासह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्याचा प्रयत्न करणारे दोन ताब्यात, वाहनासह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add