Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भुखंडाच्या नोंदीत आढळल्या चुकीच्या फेरफार नोंदी

team by team
December 18, 2023
in राजकीय
0
भुखंडाच्या नोंदीत आढळल्या चुकीच्या फेरफार नोंदी

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील बिनशेती सर्व्हे नंबर 284/2 मधील भुखंड क्रमांक 1 च्या नोंदीत नव्या फेरफार ऐवजी जुन्याच फेरफारच्या नोंदी आढळून येत आहे. यामुळे नंदुरबार तहसिलदार व तलाठी यांच्याकडून मनमानी कारभार करीत असून संबंधित अधिकार्‍यांवर नियमानुसार तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी मोहन छोटालाल श्रॉफ यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि.18 डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून नंदुरबार येथील मोहन छोटालाल श्रॉफ हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच उपोषणाला बसले आहेत. नंदुरबार येथील बिनशेती सव्र्व्हे नंबर 284/2 मधील भुखंड क्रमांक 1 हा मोहन छोटालाल श्रॉफ व अनिल माधवराव पाटील यांनी सामाईकरित्या नोंदणीकृत दस्तक्रमांक 2059/2005 दि.2 जून 2005 अन्वये खरेदी केला आहे. परंतु तलाठी नंदुरबार यांनी दुसर्‍याच फेरफार नोंदीचा आधार घेऊन सातबाराचे कब्जेदार मोहन छोटालाल श्रॉफ व राजेश रुपचंद पाटील यांची नावे टाकली होती, ती दुरुस्त होणेसाठी अर्ज केला होता. त्या अर्जाची चौकशी होऊन जिल्हाधिकारींकडील आदेश क्रमांक 2023/ जमीन/कलम 155/कावि/268/2023 दि.25 ऑगस्ट 2023 अन्वये सातबाराचे कब्जेदार सदरील तलाठी यांनी नव्याने फेरफार नोंद घेऊन सातबाराचे कब्जेदार सदरील योग्य ती दुरुस्ती करुन दुरुस्त संगणीकृत सातबारा देखील मला मिळाला.

परंतु डिजिटल ऑनलाईन सातबारा काढला असता त्यात तलाठी यांनी पूर्वी जी चुक केली होती, तीच चुक नव्याने करुन चुकीचा सातबारा निघाला आहे. ह्या फेरफार नोंदीने आपल्याकडील आदेशान्वये सातबाराचे कब्जेदार सदरील खरेदीदारांचे नावाची नोंद घेण्यात आली होती, ती नोंद कायम ठेवुन जुन्या नोंदीप्रमाणे पुन्हा चुकीची नावे तलाठी यांनी स्वतःच्या अधिकारात दुरुस्ती केली आहे,

अशी दुरुस्ती करण्यात तलाठीसह इतर संबंधितांचा हात असून पैशांचा देवाण-घेवाणीचा व्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी मोहन छोटालाल श्रॉफ यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खासदार डॉ. हिना गावित यांना ‘महा संसदरत्न’ पुरस्कार घोषित; ‘संसदरत्न’ने सलग सन्मानित होण्याचा स्थापलाय विक्रम

Next Post

शासनाच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे आदिवासींचे पारंपारिक तुरवाद्य वाजवून आंदोलन

Next Post
शासनाच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे आदिवासींचे  पारंपारिक तुरवाद्य वाजवून आंदोलन

शासनाच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे आदिवासींचे पारंपारिक तुरवाद्य वाजवून आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add