Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शालेय विज्ञान प्रदर्शनातून होतो विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीचा विकास : शिक्षणाधिकारी सतीष चौधरी

team by team
December 15, 2023
in शैक्षणिक
0
शालेय विज्ञान प्रदर्शनातून होतो विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीचा विकास : शिक्षणाधिकारी सतीष चौधरी

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

लहान वयापासून विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती व सृजनशीलतेची आवड निर्माण करून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळावा व विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण होण्यासाठी शालेय विज्ञान प्रदर्शन महत्त्वाची भूमिका महत्त्वाची भूमिका निभावतात. शिक्षणासोबत मुलांवर लहानपणापासून अभ्यासाचे कुठलेही दडपण किंवा ताणतणाव न देता त्यांच्या बौद्धिक विकासासोबत शारीरिक व मानसिक विकास करणे गरजेचे आहे.

 

 

यासाठी शालेय स्तरावर विविध शालेय उपक्रमातून त्यांच्या कलागुणांना वाव देत आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळते असे मत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीष चौधरी यांनी हिरा प्रतिष्ठान संचलित श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशु विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

 

 

कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.अनिता शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणातून विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगत आज वैज्ञानिक दृष्टिकोन लहानपणापासून निर्माण होणे ही काळाची गरज आहे तसेच विज्ञानासोबत अध्यात्माचा देखील उपयोग आपल्या बौद्धिक व भौतिक तसेच पर्यावरणाला पूरक अशा प्रगतीसाठी राबवणे गरजेचे आहे असे सांगितले तसेच विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी व त्यांनी बनवलेली उपकरणे यांचे कौतूक केले.कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र अधिव्याख्याता रमेश चौधरी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतुक करत असे उपक्रम शालेय स्तरावर नेहमी राबवले गेले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना लहान वयातच विज्ञानाची गोडी निर्माण करता येईल असे मत व्यक्त केले.

 

 

कार्यक्रमासाठी श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल च्या पर्यवेक्षिका श्रीमती विद्या सिसोदिया व हिरा उद्योग समूहाचे प्रथमेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे व उपकरणांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

 

 

यावेळी हिरा उद्योग समूहाचे गौरव चौधरी ,श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ चंद्रकांत वाणी,सौ. इंदुबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक किरण त्रिवेदी व पालक उपस्थित होते.

 

 

विज्ञान प्रदर्शनात एकूण 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ऊर्जा,टाकाऊ पासून टिकाऊ, दळणवळण,कृषी,माहिती तंत्रज्ञान,परिसरातील गमतीजमती,शैक्षणिक साहित्य अश्या विविध विषयांवर 40 उपकरणे तयार केलेली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन शसतीष काटके व आभार प्रदर्शन श्रीमती नैना सोनवणे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज भामरे,विशाल चौधरी,श्रीमती.रेणुका पेंढारकर,श्रीमती भारती मोरे, शेखर पाटील,सुधाकर ठाकूर, रवी चौधरी आदींनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शरीर सौष्ठव स्पर्धेत डॉ प्रसाद अंधारे पाचव्या स्थानावर

Next Post

नंदुरबार येथे ग्रामीण डाक सेवकांचा संप

Next Post
नंदुरबार येथे ग्रामीण डाक सेवकांचा संप

नंदुरबार येथे ग्रामीण डाक सेवकांचा संप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add