Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात पतीला ठोठावली जन्मठेप

team by team
December 12, 2023
in क्राईम
0
नंदुरबार येथे पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात पतीला ठोठावली जन्मठेप

नंदुरबार l प्रतिनिधी

खूनाच्या गुन्ह्यात आरोपीतास नंदूरबार न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावत 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अधिक माहिती अशी की, मयत रेखा अरुण नामदास हीचेवर तिचा पती आरोपी अरुण सुकलाल नामदास हा नेहमी चारीत्र्यावरुन संशय घेत होता. 22 जून 2022 रोजी मयत रेखा ही नंदुरबार येथील घरात एकटी असतांना तिचा पती अरुण व तिच्यात भांडण झाले. त्यावेळी तिच्या पतीने रागाच्या भरात घरातील लोखंडी धारदार चाकुने गळा चिरुन तिची हत्या केली होती, म्हणून अशोक देवराम खांडेकर यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस थन्यात भा.द.वि. कलम 302 प्रमाणे 22 जून 2022 रोजी आरोपीताविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा खून यासारखा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी अरुण सुकलाल नामदास वय 36 रा. प्लॉट नं. 30, सरोज नगर, नंदुरबार ता. जि. नंदुरबार यास तात्काळ अटक करण्यात आली होती.

उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई विपुल पाटील यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अरुण सुकलाल नामदास यांच्या विरुद् दोषारोपपत्र मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते.

अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार एम. आर. नातू यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच, आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष, सरकारी पक्षाचा युक्तीवाद यासर्व बाबींचा विचार करुन आरोपी अरुण सुकलाल नामदास यास भारतीय दंड संहितेच्या कलम 302 मध्ये जन्मठेपेची शिक्षा व 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सदर खटल्याचे कामकाज पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी केले असून न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. विजय चव्हाण यांनी पाहिले होते. पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस उप निरीक्षक राहुल भदाणे, पोलीस हवालदार नितीन साबळे व पोलीस नाईक गिरीष पाटील, यांनी कामकाज केले आहे.

तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच जिल्हा सरकारी अभियोक्ता श्री. गोसावी, विशेष सरकारी वकील श्री. चव्हाण यांचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डी आर हायस्कूलच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Next Post

अपहरण करुन लैंगिक अत्याचारासह खून करणाऱ्या आरोपीतास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

Next Post
अपहरण करुन लैंगिक अत्याचारासह खून करणाऱ्या आरोपीतास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

अपहरण करुन लैंगिक अत्याचारासह खून करणाऱ्या आरोपीतास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add