Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 47 लाखांचा मुद्देमालसह 18 जणांना अटक

team by team
December 12, 2023
in क्राईम
0
नवापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 47 लाखांचा मुद्देमालसह 18 जणांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी

नवापूर येथे जुगार अड्ड्यावर नवापूर पोलिस व स्थानिक गुन्हे विभागाने छापा टाकत 47 लाखांचा मुद्देमालसह 18 जणांना अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, 11 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक शपी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कलकोट ते सोनगड रस्त्याचे दरम्यान रुस्तम गामीत हा त्याच्या राहत्या घरी जुगाराचा खेळ खेळवित आहे. सदरची माहिती पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कलकोट ते सोनगड रस्त्याचे दरम्यान रुस्तम गामीत यांच्या राहत्या घराजवळ जावुन खात्री केली असता तेथे काही मोटार कार संशयीतरित्या लावलेल्या दिसून आल्या. म्हणून पथकांनी त्याठिकाणी छापा टाकला असता तेथे जमीनीवर एकूण 18 इसम 52 पत्त्यांचा झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळतांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून 4 लाख 5 हजार रुपये रोख, 43 लाख रुपये किमतीचे 5 हुंदाई कंपनीचे चारचाकी वाहने असा एकुण 47 लाख 05 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला आहे.

तसेच जुगार खेळणारे रुस्तम जमनादास गामीत, निखीलकुमार भिकुभाई शेठ, चिंतन प्रकाशभाई देसाई, पंकज गोरख चौधरी, विनोद अनंतराव चंद्रात्रे, शैलेश पुष्करभाई अग्रवाल, सुनिलभाई चिमनभाई अडतिया, सुनिलभाई प्रल्हादभाई शर्मा, हितेश हसमुखभाई अडतिया, पारसकुमार वसंतभाई मनवाणी, जितेंद्रकुमार हिरालाल अमृतीया, कामेश अनिलभाई शेठ,अनिल हरीशंकर तिवारी, केवीनभाई गिरीषभाई देसाई, रशिदभाई युसुफभाई मलीक, हितेशभाई रमणिकभाई विटलाणी (ठक्कर) , दिपन हरकांतभाई पाठक, निलेश जयराम गामीत यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, विशाल सोनवणे यांचे सह सहा. पोलीस उपनिरीक्षक युवराजसिंग परदेशी, पोलीस हवालदार दिनेशकुमार वसुले, महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे, पोलीस शिपाई गणेश बच्छे, विक्की वाघ, किशोर वळवी व संजय बोरसे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा शहरातील हॉस्पिटलमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

Next Post

अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत नंदुरबारचा समावेश करण्यात यावा : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add