Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला सुरुवात

team by team
December 11, 2023
in राजकीय
0
उमर्दे येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला सुरुवात

नंदुरबार l प्रतिनिधी

 

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यासाठी महाराष्ट्रभर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे समाजाला एकत्रित करीत त्यापार्श्वभूमीवर नंदुरबार उमर्दे येथे दि.10 डिसेंबर रोजी गुलाब महारू मराठे हे दुसर्‍यांदा अन्नत्याग आंदोलन बसले. त्यानिमित्त काल राजमाता जिजाऊ यांच्या वडीलांच्या 16 व्या वंशाचे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराज येथील राजे श्रीमंत शिवाजीराव जाधव हे उपस्थित होते. उमर्दे येथे होणार्‍या साखळी उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आले आहेत.

 

 

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यासाठी महाराष्ट्रभर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे समाजाला एकत्रित करीत त्यापार्श्वभूमीवर नंदुरबार उमर्दे येथे दि.10 डिसेंबर रोजी गुलाब महारू मराठे हे दुसर्‍यांदा अन्नत्याग आंदोलन बसले. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी सिंदखेडराज येथील राजमाता जिजाऊ यांचे वडील लखुजीराव जाधव यांच्या 16 व्या पिढीतील वंशज राजे श्रीमंत शिवाजीराव जाधव हे देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गावोगावी जनजागृती करीत आहेत.

 

 

 

त्यांनी उमर्दे येथे आंदोलन स्थळी भेट दिली.सिंदखेडराज येथील राजमाता जिजाऊ यांचे वडील लखुजीराव जाधव यांच्या 16 व्या पिढीतील वंशज राजे श्रीमंत शिवाजीराव जाधव हे देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गावोगावी जनजागृती करीत आहेत. नंदुरबार शिवातील वाघोदा येथे मराठा समाजाची सभा घेण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले की, आरक्षणाअभावी मराठा समाज आर्थिक तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागे पडलेला आहे.

 

 

 

शाहू महाराज यांच्या काळात आरक्षण मिळाले होते. परंतु दुर्देवाने मराठा समाजाला डावलले गेले. आता मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. तसेच 70 टक्के मराठा समाज हा कुणबीमध्ये गणला जातो. त्यामुळे उर्वरीत समाजाला आरक्षण देवून मुख्य प्रवाहात आणावे असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती ही महात्मा गांधी यांच्या अहिसेंच्या मार्गाने चालणारी आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणासाठी झटावे लागत आहे. आरक्षणासाठी प्रत्येकाने लढा द्यावा, असेही आवाहन त्यांनी सकल मराठा समाजाला केले आहे.

 

राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त
जन्मस्थळापासून समाध्दीस्थळी अभिवादन रथयात्रा

यावेळी मराठा समाज बांधवांना राजे श्रीमंत शिवाजीराव जाधव यांनी आवाहन केले आहे की, राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी रायगड जिल्ह्यातील पाचाड येथील समध्दीस्थळी सालाबादाप्रमाणे साजरी करण्यात येते, परंतु समाजातील केवळ 60 ते 70 व्यक्तीच या कार्यक्रमाला उपस्थित असतात. त्यामुळे यावर्षापासून सिंदेखडराज येथील त्यांच्या जन्मास्थळी असलेल्या राजवाडी विहीरीतील पाणी घेऊन अभिवादन रथयात्रा मोठ्या संख्येने दि.15 जून ते 17 जून 2024 ला पाचाड येथे त्यांच्या समाध्दीस्थळी अभिवादन रथयात्रा काढण्यात येणार आहे.

 

 

 

 

त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील समाज बांधवांनी पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा येथील निवृत्त कमिशनर जे.बी.पाटील, धुळ्याचे निंबाजी मराठे, नितीन जगताप, उपोषणकर्ते गुलाब मराठे, नवनीत शिंदे हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी जितेंद्र खांडवे, शिक्षक अनिल वायकर, विक्की मराठे, अण्णा पवार, हरीष हराळ, किरण दाभाडे, दिनेशचंद्र मराठे, हिरालाल मराठे यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील उमर्दे, कोळदा, रजाळे, नंदुरबार, तळोदा शहर व तालुक्यातील तळवे येथील मराठा समाजातील युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण दाभाडे यांनी केले तर आभार सकल मराठा समाजाचे नितीन जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाघोदा येथील विक्की मराठे यांच्या कुटूंबियांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

शरीर संपदेसाठी मानवी आयुष्यात योगासन महत्त्वाचे : निवृत्ती पवार

Next Post

नंदुरबारच्या श्री काशिनाथ बाबा मंदीर यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धाचे आयोजन

Next Post
नंदुरबारच्या श्री काशिनाथ बाबा मंदीर यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धाचे आयोजन

नंदुरबारच्या श्री काशिनाथ बाबा मंदीर यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add