Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा तीर्थक्षेत्राला लाभणार नवा ‘लुक’; रस्ते व सुशोभीकरणाला दिले पाच कोटी: मंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
December 6, 2023
in राजकीय
0
प्रकाशा तीर्थक्षेत्राला लाभणार नवा ‘लुक’; रस्ते व सुशोभीकरणाला दिले पाच कोटी: मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील तापी काठच्या प्रतीकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केदारेश्वर मंदिर परीसरातील घाटांना आणि रस्त्यांना सुशोभीकरणाचा नवा ‘लूक’ दिला जाणार असून प्रकाशा शहरातील रस्त्यांचा देखील नव्याने विकास केला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यातील तापी काठावरील प्रतीकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केदारेश्वर मंदिर परीसराचे सुशोभीकरण केले जाणार असून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने त्याचा आराखडा निश्चित केला आहे. त्या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच त्या कामाचा प्रारंभ केला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी प्रत्यक्ष प्रकाशा येथे केदारेश्वर मंदिर परिसराला भेट देऊन पाहणी केली. तेथील घाटांचे, रस्त्यांचे आणि स्मशानभूमीचे आराखडे अधिकाऱ्यांकडून समजून घेतले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्रभाई पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहादा येथील कार्यकारी अभियंता मयूर वसावे, इंजि. आकाश पाटील, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपण पाच कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्या पाच कोटींमध्ये या परिसरातील रस्ते त्याचबरोबर या नदीकिनारी व घाटाच्या बाजूला सर्व बसण्याची व्यवस्था केली जाईल. मंदिर परिसरातील विक्रेत्यांची व्यवस्था होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशस्त कॉम्प्लेक्स उभारणे, परिसराला सुशोभित करू शकणाऱ्या विद्युत दिव्यांची उभारणी करणे यासारख्या कामांचाही त्यात समावेश राहील. घाटावर विविध प्रकारच्या विधीसाठी येणाऱ्या भाविकांना वस्त्रपालटण्यासाठी खुल्या करून दिल्या जातील.

पूर्वीची स्मशानभूमी देखील विकसित केली जाणार असून तिथपर्यंत जाण्यासाठी चे पक्के रस्ते केले जातील. जे काही भक्त येतील त्यांना स्मशानभूमी कडे जाणाऱ्या लोकांचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्यासाठी वेगळा रस्ता करून दिला जाणार आहे. आपण पर्यटन विभागाला दिलेल्या पाच कोटी मधून प्रकाशा शहरातील रस्ते विस्तारित करणे काँक्रिटीकरण करणे याबरोबरच शहादा व नंदुरबार कडे जाणाऱ्या प्रकाशा येथील रस्त्यांचे नवनिर्माण करणे अशा कामांचाही समावेश करण्यात आला आहे; अशी माहिती याप्रसंगी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात १० डिसेंबरला निरंकारी मंडळातर्फे ‘४४ व्या खान्देश निरंकारी सत्संग समारोहचे’ आयोजन

Next Post

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add