Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सोमवारपासून नंदुरबारातून काँग्रेसतर्फे शेतकरी संवाद पदयात्रेस सुरुवात

team by team
December 2, 2023
in राजकीय
0
काँग्रेस किसान विभागाची ४ डिसेंबरला नंदुरबारातून किसान संवाद पदयात्रेस सुरुवात

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्यातील शेतकर्‍यांच्या समस्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अंतर्गत प्रदेश किसान कॉंग्रेस विभागाची शेतकरी संवाद यात्रेची सुरुवात नंदुरबार जिल्हापासून प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थिती होणार असून यावेळी कॉंग्रेसचे आजी-माजी आमदार, खासदार, विविध सेलचे पदाधिकारी, जि.प.सदस्य, ग्रा.पं.सदस्य, नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कॉंग्रेस किसान विभागाचे प्रदेश सचिव देवाजी चौधरी यांनी केले आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. धान, कापूस, ऊस, सोयाबीन व इतर पिकांच्या पिकविम्याची रक्कम अजुनही शेतकर्‍यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे जगणेच मुश्कील झाले आहे. परंतू सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे तीळमात्र लक्ष द्यायला तयार नाही. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून राज्यातील शेतकर्‍यांच्या विविध समस्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अंतर्गत असलेला प्रदेश किसान कॉंग्रेस विभागाची दि.४ ते ११ डिसेंबर २०२३ या दरम्यान शेतकरी संवाद यात्रा होणार आहे.

ही दि.४ डिसेंबर २०२३ रोजी नंदूरबार जिल्ह्यातून सुरू होऊन दि.११ डिसेंबर २०२३ रोजी या यात्रेचे मोर्चात रूपांतर होऊन नागपूर येथे संपन्न होणार आहे. यावेळी कॉंग्रेस किसान विभागाचे प्रांताध्यक्ष पराग पाष्टे यांच्या नेतृत्त्वात संवाद पदयात्रा होणार असून यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ.ॲड.के.सी.पाडवी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जिल्हाध्यक्ष व आ.शिरीषकुमार नाईक, सुभाष पाटील, दिलीप नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जास्तीत जास्त कॉंग्रेस कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हयात रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे : प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी

Next Post

महाराष्ट्रात प्रथमच नंदुरबारला सिकलसेल तपासणी यंत्र झाले प्राप्त; 2 लाख विद्यार्थ्यांची तपासणी करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add