नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 पैकी 45 जागांवर महायुती विजयी होईल असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी तर्फे ” घर चलो अभियान ” नंदुरबार येथून सुरूवात करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित , भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी , खा. डॉ.हिना गावित , जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी , आमदार राजेश पाडवी , माजी आ.शिरीष चौधरी , भाजपा उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा भाजपा मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, दीपक बापू पाटील, राजेंद्र गावित, तुषार रंधे, अजय भोळे, नागेश पाडवी, कैलास चौधरी, महेंद्र पाटील, मोहन सूर्यवंशी, कुशल चौधरी, सौ. शाजूबाई वळवी, निकेश राजपुत, अर्जुन मराठे, जिल्हातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.
ना. डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, घर चलो संपर्क अभियानातून भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना गोर गरीब जनते पर्यत पोहोचल्या पाहीजे. सशत्त्क्त शेतकरी , समृद्ध भारत या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत 12 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत तसेच प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत 37.5 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी केली. तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तातडीच्या उपाय योजना करणे चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून तापी – बुराई योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणे चालू असून त्याला यश आले आहे. त्या कामाला आवश्यक असलेली शासकीय मान्यता येत्या पंधरा दिवसात प्राप्त होईल.
भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी म्हणाले की, घर चलो संपर्क अभियानात तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित 500 बोहरी समाजातील व्यक्तींनी भाजपात प्रवेश केला आहे. तसेच येणाऱ्या लोकसभा , विधानसभा निवडणुकीचा उमेदवाराला शंभर टक्के निवडुण आणार अशी ग्वाही देतो.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सन 2024 मध्ये होणाऱ्या निवडणूकीत आपल्याला 45 खासदार तसेच मोठ्या संख्येने आमदार निवडुन आणायचे आहेत. त्यासाठी घर चलो संपर्क अभियानाला सुरूवात केली. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 ला रामललाची मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आपण आपल्या जिल्हातून मोठ्या संख्याने आयोध्याला यावे. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षे विविध योजना राबविलेल्या आहेत. त्यांत पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास अंतर्गत पीएम गति शक्ती मास्टर प्लँनची स्थापना , सन 2024 पासुन वाहतूक आणि महामार्ग बजेटमध्ये 500 टक्के वाढ तसेच सांस्कृतिक वारसाचे नवीन युग अंतर्गत आदिवासी स्वाभिमान दिन आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित 10 आदिवासी संग्रहालये तसेच अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर आणि काशी विश्वनाथ आणि उज्जैन महाकाल मंदिरात भव्य कॉरिडॉरचे बांधकाम
तसेच ईशान्येकडील राज्यांचा ऐतिहासिक विकास अंतर्गत आदिवासी आसाम शांतता करार आणि बोडो नागा , कार्बी शांतता कराराने ईशान्येत शांतता प्रस्थापित केली. तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये अतिरेकी घटनांमध्ये 76 टक्के घट झाली. तसेच अंत्योदय हेच ब्रीदवाक्य अंतर्गत विविध योजना राबविलेल्या जात आहेत. तसेच भारतातील अमृत पिढी सक्षम बनते. तसेच नारी तू नारायणीः महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 9.6 कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले. ह्या योजना संसदरत्न खा. डॉ. हिना गावित आपल्या लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात राबविलेल्या आहेत. ह्या योजनाची माहीती देण्यासाठी घर चलो संपर्क अभियान सुरु करण्यात आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 पैकी 45 जागांवर महायुती विजयी होईल असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठ्या उत्साहांत स्वागत करण्यात आहे. या प्रसंगी नंदुरबार येथे घरचलो संपर्क अभियानाची प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागरीकांशी संवाद साधला. तसेच रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी व्यासपीठ उभारुन विविध विषयांवर आधारीत धन्यवाद मोदीजी या संदेशाचे सादरीकरण करण्यात आले होते.
सकाळी १० वाजता नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरात सुपरवॉरियर्स पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अभियान रॅलीत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








