नंदुरबार l प्रतिनिधी
नगांव ता.नंदुरबार ग्राम पंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. सरपंच पदासाठी अनिता रविंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी होते.
नंदुरबार तालुक्यातील नगाव ग्रामपंचायत ची निवडणूक १४ जानेवारी २०२१ रोजी झाली. यावेळी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाच्या अनिता रविंद्र पाटील यांची दुसऱ्या टर्म साठी सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडीने नगांव, तिशी, भालेर या तिन्ही ग्राम पंचायतीत शिंदे गटाचे सरपंच झाले आहेत.

शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी संघाचे अध्यक्ष बी. के.पाटील, अविनाश पाडवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिनेश पाटील, किशोर पाटील, यांच्यासह भालेर ,नागाव,तिसी गावातील पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिनेश पाटील, भालेरचे उपसरपंच गजानन पाटील, सामाजिक कार्यकर्ते नाना करसन ठाकरे, अधिकार धनगर , युवराज पाटील यांनी सरपंच निवडणूक बिंनविरोधसाठी प्रयत्न केले.निवडणूक अधिकारी म्हणून एन. डी. पानपाटील यांनी काम पाहिले.








