नंदुरबार l प्रतिनिधी
Q¹
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीबाबत नागरिकांकडे उपलब्ध असलेले १९६७ पूर्वीचे पुरावे २१ ते २४ नोव्हेबर २०२३ या कालावधीत स्वीकारले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एक शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती बाबत नागरिकांकडे १९६७ पुर्वीचे उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज या सारखे जुने अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे स्थापित जिल्हास्तरीय विशेष कक्षात २१ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सादर करावेत, असेही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.








