म्हसावद। प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी(19 वर्षाखालील मुले/ मुले) या क्रीडा स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याची वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अर्पिता महेंद्र काटे हिने तलवारबाजीच्या ईपी या क्रीडा प्रकारात वैयक्तिक ब्रांच मेडल प्राप्त केले आहे.
तसेच ती 67 वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली असून सदर स्पर्धा 20 ते 24 नोव्हेंबर 2023 रोजी जम्मू कश्मीर येथे होणाऱ्या तलवारबाजी स्पर्धेत कु. अर्पिता काटे ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ती वैयक्तिक ईपी क्रीडा प्रकारात नाशिक विभागातून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली नंदुरबार जिल्ह्यातील पहिली खेळाडू आहे .
तिच्या ह्या यशाबद्दल नाशिक विभागाचे उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा नाशिक रवींद्र नाईक तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी , नंदुरबार श्रीमती सुनंदा पाटील, छत्रपती पुरस्कार विजेते बळवंत निकम,नंदुरबार जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद कांबळे व उपाध्यक्ष वसीम तसेच सचिव भगूराव जाधव तसेच क्रीडाशिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनिल सूर्यवंशी, राज्य युवा शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ. श्री मयूर ठाकरे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.








