Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिनी फटाके तसेच देवी-देवता व राष्ट्र पुरुषांची चित्रे असलेली फटाके विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा , हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

team by team
November 7, 2023
in सामाजिक
0
चिनी फटाके तसेच देवी-देवता व राष्ट्र पुरुषांची चित्रे असलेली फटाके विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा , हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी ते अत्यंत प्रदूषणकारी आहेत त्यावर भारत सरकारने बंदी सुध्दा घातली आहे. घातक अश्या चिनी फटाके आणि देवीदेवता आणि राष्ट्रपुरुष यांचे चित्र असलेली फटाके विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समितीच्या धर्मसेवकांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, भारतात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाक्यांचे प्रमाण वाढले आहे. या फटाक्यांमध्ये घातक अश्या विषारी पदार्थांचे प्रमाण अधिक आहे. ते तयार करण्यासाठी ‘पोटॅशिअम क्लोराईड’ आणि ‘पोटॅशिअम परक्लोराईड’ यांचे रासायनिक मिश्रण वापरले जाते.भारतात या रासायनिक पदार्थांच्या वापरावर बंदी असतांना चिनी बनावटीचे फटाके अवैध मार्गाने देशात येऊन त्याची विक्री होत आहे,

तरी त्यावर कारवाई करून त्याच्या विक्रीस प्रशासनाने बंदी आणावी. तसेच विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच फटाक्यांवर मोठ्या प्रमाणात चित्रांद्वारे हिंदू देवीदेवता आणि राष्ट्रपुरुषांची विटंबना केली जाते ती पूर्णपणे थांबवावी व जे फटाके विक्रेते देवी- देवता यांची चित्रे असलेली फटाके विक्री करतील त्यांच्यावर भा.द.वि. कलम २९५/अ अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

काल फटाके विक्रेते यांची बैठक श्री वाघेश्वरी माता मंदिर येथे पार पडली या बैठकीत हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, राजू चौधरी यांनी प्रबोधन करून चिनी फटाके आणि देवी- देवता यांचे चित्र असलेले फटाके विक्री करू नये यावर मार्गदर्शन केले, बैठकीत ३५ पेक्षा जास्त परवानाधारक फटाके विक्रेते उपस्थित होते. निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, क्षत्रीय राणा राजपूत सेवा समितीचे चेतन राजपूत, जितेंद्र राजपूत आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा मतदारसंघातील दहा पैकी आठ ग्रामपंचायतींवर भाजपाचा विजयाचा दावा

Next Post

आदिवासी शेतकऱ्यांचे पोल तोडो, जमीन छोडो आंदोलन

Next Post
आदिवासी शेतकऱ्यांचे पोल तोडो, जमीन छोडो आंदोलन

आदिवासी शेतकऱ्यांचे पोल तोडो, जमीन छोडो आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add