नंदूरबार l प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती व जिल्हा परिषद अंतर्गत आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित ,खा.डॉ.हिना गावित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते टॅब वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, समाज कल्याणचे निरीक्षक प्रदीप वसावे, समाज कल्याणचे निरीक्षक डी.बी.कोकणी, कर्मचारी विजयसिंग गिरासे, हेमंत बिरारे, एस.के. गांगुर्डे, योगेश भामरे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील जे ई ई / एन ई ई / एम एच टी / सी इ टी परीक्षेत बसलेल्या इतर मागास बहुजन कल्याण तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना हे टॅब देण्यात आले आहेत.








