Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दिवाळी निमित्त 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा, मैदा व पोह्यांचाही समावेश

team by team
November 3, 2023
in राजकीय
0
दिवाळी निमित्त 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा, मैदा व पोह्यांचाही समावेश

नंदुरबार l प्रतिनिधी

 

जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब योजनेतील 2 लाख 67 हजार 200 पात्र शिधापत्रिकाधारकांना येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त शासनाकडून 100 रुपयांत 6 शिधाजिन्नसांचे संच असलेला ‘आनंदाचा शिधा’ वाटप केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 

 

 

जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त दिवाळीमध्ये पुन्हा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. 100 रुपयांत एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, मैदा व पोहा हे 6 शिधाजिन्नस संच मिळणार आहेत. गोरगरीब कुटूंबीयांसाठी हा आनंदाचा शिधा आधार ठरणार आहे. दिवाळीच्या दिवसांत जिल्ह्यातील पात्र रेशन कार्डधारकांना 100 रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. सणासुदीच्या दिवसांत खाद्यतेल, डाळी, साखरेचे भाव वाढले की, सर्वसामान्य कुटूंबांची अडचण होते.

 

 

याबात मंत्रिमंडळ निर्णय झाल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचा लाभ होणार आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून वाटप सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.

 

 

 

*हे असतील पात्र*
अंत्योदय, प्राधान्य कुटूंब, पात्र कार्डधारकांना याचा लाभ मिळणार असून आनंदाचा शिधा वाटपासाठी जिल्ह्यात पुरेसा धान्याचा पुरवठा केला जात आहे. पुरवठा विभागाकडून मिळणाऱ्या या आनंदाच्या शिधामध्ये 100 रुपयात रेशनकार्डधारकांना एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, मैदा व पोहा हे 6 शिधाजिन्नस संच मिळणार आहे. हे साहित्य खुल्याबाजारात किमान 300 ते 350 रुपयांचे आहे.

 

 

 

दिवाळी उत्सवनिमित्त वितरीत करावयाचा संच 25 ऑक्टोंबर, 2023 पासुन सुरू झाला असून 30 नोव्हेंबर, 2023 पर्यंत तो मिळू शकेल. जिल्ह्यातील 2 लाख 67 हजार 200 पात्र कुटूंबाना आनंदा शिधा वाटपाचा लाभ मिळणार आहे. दिवाळी सणाच्या दिवसात जिल्ह्यातील रेशनकार्डधारक कुटूंबांना 100 रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ थेट रेशन दुकानांमधून मिळणार आहे. हे संच पुरवठादारांकडून संबंधित तालुका गोदामात पुरवठा होताच रेशन दुकानदारांमार्फत पात्र लाभार्थ्यांना मिळू शकतील. जिल्हयातील अंत्योदय योजना व प्राधान्य कुटूंब योजनेतील पात्र कार्डधारक लाभार्थ्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानातुन ‘आनंदाचा शिधा’ संच प्राप्त करुन घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

 

 

दृष्टिक्षेपात वितरण
नंदुरबार : 58 हजार 354
नवापूर : 48 हजार 501
शहादा : 65 हजार 623
तळोदा : 27 हजार 515
अक्कलकुवा : 39 हजार 499
अक्राणी : 27 हजार 708
एकूण : 2 लाख 67 हजार 200

बातमी शेअर करा
Previous Post

खानदेश स्तरीय विभागीय कृषी मेळाव्याचे दिमाखात उद्घाटन, कृषी दिंडीने वेधले सर्वांचे लक्ष

Next Post

नंदूरबार शहर पोलीसांनी चोरीच्या 4 लाखाचा 10 दुचाकी केल्या जप्त

Next Post
नंदूरबार शहर पोलीसांनी चोरीच्या 4 लाखाचा 10 दुचाकी केल्या जप्त

नंदूरबार शहर पोलीसांनी चोरीच्या 4 लाखाचा 10 दुचाकी केल्या जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add