Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीज ग्राहकांना निर्धारित मानकांप्रमाणे सेवा द्यावी : विश्वास पाठक

team by team
November 3, 2023
in राज्य
0
वीज ग्राहकांना निर्धारित मानकांप्रमाणे सेवा द्यावी : विश्वास पाठक

नंदुरबार l प्रतिनिधी

 

अलिकडच्या काळात वाढविण्यात आलेल्या विद्युत पायाभूत सुविधांमुळे अपघात विरहित सेवा मिळणे अपेक्षित आहे. सोबतच ग्राहक आणि लोकप्रतिनिधींच्या वीज विषयक समस्यांचा निपटारा तातडीने करण्यात यावा. निर्धारित मानकांप्रमाणे तत्पर ग्राहक सेवांवर प्राधान्याने लक्ष देण्यात यावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक मा. विश्वास पाठक यांनी नंदुरबार येथे दिले.

 

 

विद्युत ग्राहक आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या वीज सेवेसंबंधीच्या समस्या तसेच विद्युत क्षेत्रातील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी मा. विश्वास पाठक यांचा जिल्हानिहाय दौरा सुरु आहे. आज बुधवार दि.01 नोव्हेंबर 2023 रोजी खानदेशातील नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात आढावा बैठक झाली.

 

 

 

बैठकीस आमदार आमश्या पाडवी, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर, मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विद्युत क्षेत्रातील अधिकारी-अभियंते कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे. येथील विद्युत विकास कामांच्या आढाव्यासोबतच संचालक मा. पाठक यांनी जिल्ह्यातील विजेचा महसूल, महसुलाची वसूली, थकबाकी, विजेची गळती, त्यावरील उपाय योजना, पायाभूत सुविधा, विद्युत पुरवठा यंत्रणेची सद्यास्थिती आणि आगामी काळात करावयाच्या विकास कामांचा आढावा घेत ग्राहकांना घरगुती, वाणिज्यक, औद्योगीकसह कृषी वीज जोडण्या तातडीने देण्याच्या सूचना दिल्या.

 

 

 

विजेची वाणिज्यक हानी कमी करण्यासाठी विजेच्या देयकांची नियमित वसूली गरजेची असून त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्याच्या सुचनाही मा. पाठक यांनी महावितरण यंत्रणेस दिली. वीज देयकांच्या वसूलीसह ग्राहकांना रोहित्रांची उपलब्धता, विजेचा अखंडित पुरवठा व इतर अनुषंगीक सेवाही तातडीने देण्याचे निर्देश बैठकीत दिले.

 

शेतकऱ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण विद्युत पुरवठा आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने नादुरुस्त रोहित्र बदलून देण्याचे निर्देश त्यांनी विद्युत यंत्रणेस दिले.

 

आ. आमश्या पाडवी यांनी ग्राहकांच्या वीज समस्यांकडे लक्ष केंद्रित करुन त्या तातडीने सोडविण्याची मागणी संचालक श्री विश्वास पाठक यांच्याकडे केली.

 

बैठकीच्या प्रसंगी महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे आणि महापारेषणचे मुख्य अभियंता संजय भोळे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहक, विजेची मागणी, पुरवठा, महसुलाची स्थिती व विद्युत विकास कामांचा अहवाल सदर केला.

बातमी शेअर करा
Previous Post

अपघाती मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना साडे तीन लाखाचा मदतनिधी

Next Post

नंदुरबार तालुक्यासाठी दुष्काळाच्या सवलती लागू : मनीषा खत्री

Next Post
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, दिव्यांग कल्याण अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत  ‘दिव्यांगांच्या दारी’ अभियान

नंदुरबार तालुक्यासाठी दुष्काळाच्या सवलती लागू : मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add