Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात संकलित मूल्यमापनाला सुरुवात

team by team
November 1, 2023
in शैक्षणिक
0
नंदुरबार जिल्ह्यात संकलित मूल्यमापनाला सुरुवात

नंदुरबार l प्रतिनिधी

स्टार प्रकल्पांतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या नियतकालिक मूल्यमापन चाचण्यांना (PAT) जिल्हाभरात सुरुवात झाली. जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानीत शाळांतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या संकलित मूल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या नियोजनानुसार राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी क्र. 1 चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 30 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर 2023 या तीन दिवसात राज्यभरातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी या चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुरू असलेल्या या मूल्यमापन चाचण्यांसाठी पर्यवेक्षकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सावन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री प्रवीण अहिरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी  सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण,  भावेश सोनवणे यांच्या नेतृत्वात या चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या चाचणीसाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून, संपूर्ण राज्यातील सर्व शाळांमध्ये समान पद्धतीने मूल्यमापन व्हावे, या उद्देशाने या चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी अशा चाचण्या शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या आहेत. मात्र राज्यस्तरावरून अशा चाचणीचे आयोजन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे योग्यरित्या मूल्यमापन होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता  प्रवीण चव्हाण, अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. वनमाला पवार, डॉ. बाबासाहेब बडे, प्रदीप पाटील, विभाग प्रमुख  विनोद लवांडे, सुभाष वसावे, विषय सहायक  देवेंद्र बोरसे यांच्यासह तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी शाळाभेटी करून पडताळणी करत असून, क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी या परीक्षेसाठी मार्गदर्शन व मदत करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात हृदयरोग शिबीरात 150 जणांची मोफत तपासणी

Next Post

नंदुरबारसह देशातील हृदयरोगाच्या घटनांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उपाय योजना करावी :भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add