नंदुरबार l प्रतिनिधी
तापी बुराई सिंचन प्रकल्पासाठी स्वतः पाठपुरावा करणार असून, महिनाभराच्या आत नुसती बैठकीकच घेतली जाणार नाही तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सरकार न्याय देईल असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.
उद्योग मंत्री उदय सामंत शुक्रवारी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.दुपारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात पत्रकार परिषद घेण्यात आली त्याप्रसंगी त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
याप्रसंगी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख ॲड.राम रघुवंशी उपस्थित होते. यावेळी मंत्री सामंत म्हणाले,जिल्ह्यातील काही भाग आदिवासी तर काही भाग बिगर आदिवासी आहे.दोन्ही घटकांच्या समतोल राखून भालेर एमआयडीसीतील पाण्याच्या व जमीन सपाटी करण्याच्या प्रश्न मिटवून सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ.
पत्रकार परिषदेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर टीकेची झोळ उठऊन त्यांना फैलावर घेत महायुतीवर टीका करणाऱ्यांच्या पुढील निवडणुकीत भुई सपाट होणार असल्याच्या आरोप त्यांनी केला.








