शहादा l प्रतिनिधी
युवक व क्रीडा कल्याण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष महाराष्ट्र शासन व रासेयो विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे दत्तक गाव पुरुषोत्तमनगर येथे स्वच्छ भारत 3.0 विशेष अभियानांतर्गत स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला.
दि. 2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशभरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन सर्व स्तरावर होत असून प्लास्टिक व कचरा मुक्त परिसर हे उद्दिष्ट आहे. या दरम्यान पुरुषोत्तमनगर येथे स्वच्छता रॅली द्वारे गावात जनजागृती करण्यात आली. रासेयोच्या उपक्रमात गावातील नागरिकांनी सुध्दा आनंदाने सहभाग होऊन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्वतोपरी योगदान देऊ असा निश्चय केला.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल, डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. वर्षा चौधरी, डॉ. वजीह अशहर व रासेयो स्वयंसेवकांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.








